मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-23 साठीचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यावर हा अर्थसंकल्प उधारीचा वायदा करणारा आणि महत्त्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
महिला, शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येणार! वाचा यंदाचा अर्थसंकल्प
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा यापूर्वीच्या अर्थसंकल्पात केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी केलीच नाही. याची कबुली अर्थमंत्र्यांनी दिली आणि आता आगामी वर्षात वचनपूर्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था रुळावर आली आणि विकासाचा वेग वाढला म्हणून कालच आर्थिक पाहणी सादर करताना दावा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना द्यायच्या निधीबाबत जबाबदारी का पार पाडली नाही आणि आता उधारीचा वायदा का केला हे सांगितले पाहिजे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची अवस्था काॅंग्रेससारखी होईल, त्यांनी भाजपसोबत यावे रामदास आठवले
एसटी ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे हे अर्थमंत्री कबूल करतात पण संपामुळे बंद पडलेली एसटीची चाके पुन्हा सुरू करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याच्या ऐवजी केवळ नव्या बसेससाठी घोषणा करून या सरकारने दिशाभूल केली आहे. त्याच प्रमाणे पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून सामान्य माणसाला दिलासा देण्याची जबाबदारीही अर्थसंकल्पात टाळली आहे. असंही ते म्हणाले.
भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही! अमोल मिटकरींची भाजपवर खरमरीत टीका
विकासाची पंचसूत्री सांगताना अर्थमंत्र्यांनी अल्पसंख्यांक समाजाचा आवर्जून उल्लेख करून त्यांच्यासाठीची योजना सांगितली. परंतु त्यांना मराठा व धनगर समाजांचा विसर पडला. या समाजांसाठीही काम करण्याची या सरकारची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
Read also:
- अर्थसंकल्प 2022! पुणे जिल्ह्यांसाठी अजित दादांनी दिलं भरभरून निधी
- सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- फक्त तोंडाला पान पुसण्याचं काम सरकारने केलंय! 2022 च्या अर्थसंकल्पावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- अजित दादांचं मराठी प्रेम! यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा भवनासाठी 100 कोटींची तरतुद
- अर्थसंकल्प 2022! एसटी आंदोलनावर यंदाच्या अर्थसंकल्पात तात्पुरती मलमपट्टी; वाचा