पुणे : काही राजकीय नेते मास्क वापरत नसल्याने त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला. ऑपरेशन करायला गेेले आणि कोरोना झाला. त्यामुळे मागील दिवस वाया गेले, अंस म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. राज ठाकरे हे रूग्णालयात शस्त्रक्रिया गेले असता. त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याने त्यांनी शस्त्रक्रिया पुढे ढकलली. त्यावरून अजित पवारांनी त्यांना टोला लगावला.
“मोदींच्या नेतृत्वाखाली एक छोटासा सैनिक म्हणून काम करणार”; हार्दिक पटेल
केंद्र सरकारने जवळपास 86 हजार 912 कोटी रूपये राज्यांना वितरीत केले आहेत. अजूनही केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे 15 हजार 502 कोटी रूपये येणं बाकी आहे. ती रक्कम केंद्र सरकारने लवकर दिल्यास राज्यातील विकासकामे जोरात सुरू होतील, अशी आशा देखील अजित पवारांनी व्यक्त केली. तसेच कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने राज्यात काळजीचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे सगळ्यांनी मास्क लावणं गरजेचं आहे. राज्याने घालून दिलेल्या नियमाचं पालन देखील करणं महत्वाचं असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
भाजपने आयोजित केलेल्या स्पर्धेत ‘राष्ट्रवादीचा जलवा’ ; आमदार सुनील शेळकेंनी जिंकली 12 लाखांची बोलेरो
राज्यात महाविकास आघाडी सरकार असून प्रत्येक राजकीय पक्षाला प्रत्येकाचा पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. राज्यात काहीही असंल तरी स्थानिक परिस्थिती विचारात घ्यावी लागते. त्यामुळे नाना पटोले यांनी केलेले मत हे त्यांचे वैयक्तीक असू शकतं. तसेच राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या निवडणुकीत वकिलांच्या मार्फत न्यायालयात जाऊन अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाचा अधिकार द्यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.
“विलास लांडे यांनी कावेबाज लोकांना ओळखावे अन् पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावी”
दरम्यान, नाशिक येथे हनुमानाच्या जन्म स्थळावरून साधूंमध्ये गोंधळ उडाला होता. त्यावर बोलाताना अजित पवार म्हणाले की, महंत चर्चेला बसले आणि माईक मारला, यातून काय मिळणार? याचाही सर्वांनी विचार करावा, तसेच राज्यात अनेक ठिकाणांच्या नामकरणाच्या मागण्या आल्या आहेत. मात्र तो मुद्दा सध्या गरजेचा नाही असंही ते म्हणाले.
Read also:
- “राज्यसभेच्या निवडणुकीसारखं, विधान परिषदेच्या निवडणुकीतही ‘भाजप’ आघाडीला रडवणार”
- भाजपचे महाडिक विजयी होणार, आणि महाविकासआघाडीचा बडा नेता घरी बसणार
- राज्यसभा निवडणूकिसाठी फडणवीसांची मोर्चेबांधणी, अपक्ष आमदरांना गळाला लावणार?
- राज्यसभा निवडणुक; नवाब मलिक, अनिल देशमुखांसाठी अजित पवार न्यायालयात जाणार ?
- “संभाजीनगरच्या”टोमणे सभेत”ढोंगी हिंदुत्ववादी उत्तर देणार का?” सभेआधी मुख्यमंत्र्यांना मनसेने डिवचलं