मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार भंडारा आणि गोंदियातील जिल्हा परीषदेच्या निवडणुका देखील पुढे ढकलण्याच्या तयारीत होतं. मात्र निवडणूक आयोगाने राज्य सरकारला धक्का दिला आहे.
जर मी बिनधास्तपणे बोलायला लागले तर अवघड होईल; रुपाली पाटील यांचे वसंत मोरेंना थेट उत्तर
कारण नियोजित निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल करण्यास नकार देण्यात आलाय. तसेच राज्य निवडणूक आयोगाने भंडारा आणि गोंदियासाठी मतदान व मतमोजणीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी आमदार संजय पवारांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा झाली आहे. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
एसटी आंदोलनाचा अनिल परबांनी घेतला धसका; परबांच्या सुरक्षा व्यवस्थेत झाली मोठी वाढ
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते.
म्हाडा, टीईटी पेपर फुटी प्रकरण: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक
सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे सुरू आहे.
Read also:
- एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यासाठी आयोगाला विचार करावाच लागेल – बाळासाहेब थोरात
- एसटी कर्मचाऱ्यांनो, आता सहनशीलता संपत आलीयं, आमचा अंत पाहू नका; अजित पवारांचा इशारा
- आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडीची सत्ता आहे; अशोक चव्हाण यांच वक्तव्य
- राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मला सुरक्षित असल्याची जाणीव होतेयं; रुपाली पाटलांच्या भावना
- ओबीसी आरक्षणासाठी लवकरात लवकर कोर्टात धाव घ्या; पंकजा मुंडेंची आर्त हाक