मुंबई : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मनसेतील राजकीय घडामोडींना आज अखेर पुर्णविराम दिला आहे. मनसेचे पुणे शहराचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांंच्यासोबत नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर देखील उपस्थित होते. त्यामुळे या भेटीनंतर मी पुर्णपणे समाधानी असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागील मुख्य सुत्रधार शोधा; काॅंग्रेस नेत्याची मागणी
रामदास आठवले म्हणाले की, कुणाला लाऊडस्पीकर लावायचा असेल, मंदिरांवर लाऊडस्पीकर लावायचा असेल तर हरकत नाही. काही मंदिरांवर लाऊडस्पीकर आहेत. त्यामुळे मशिदीवर जे त्यांचे पंरपरागत लाऊडस्पीकर लावलेले आहेत. ते लावतायत म्हणून आम्ही लावू अशी भूमिका घेणं योग्य नाही. पूर्वीपासून ज्या ठिकाणी भोंगे आहेत. तिथे आहेत. मंदिरांवरही लाऊडस्पीकर असल्याचंं आम्ही पाहिलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
भाजपच्या हुकुमी एक्काला अटक होणार! न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष
त्यामुळे विरोधाला विरोध करण्याची भूमिका योग्य नाही. राज ठाकरे हे एका पक्षाचे मुख्य नेते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत. पण ते त्यांचे वारसदार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे उद्धव ठाकरे वारसदार असून ते आमच्यासोबत येत नाहीत याचा आम्हाला खेद आहे. असंही ते म्हणालेत.
मनसेला धक्क्यावर धक्के! धुळ्याच्या उपमहानगर प्रमुखांनी दिला राजीनामा
दरम्यान, मी माझ्या साहेबांसोबत. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही. मी पहिल्यापासून सांगत आलो आहे की, मी शेटवपर्यंत मनसेतच राहणार आहे. उद्या ठाण्यात राज ठाकरे यांची सभेत सभा होत आहे. त्या सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. त्यामुळे मला साहेबांनी सांगितलं की उद्या तु सभेत ये. त्यामुळे मी देखील त्या सभेला जाणार आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मी पुर्ण समाधानी असल्याचंही वसंत मोरे यांनी सांगितलं आहे.
Read also:
- “सोमय्या पळणारा नेता नाही, पळवणारा नेता आहे”; प्रवीण दरेकांचा आघाडीवर निशाणा
- “मनसेला जवळ केल्यास फटका बसू शकतो, याचा अंदाज भाजपला आला असेल”; जयंत पाटलांचा टोला
- ..तर पक्षांवर देखील कारवाई होईल; विक्रांत प्रकरणावरून सरकारी वकिलांनी दिला इशारा
- मुख्यमंत्र्यांनी मला संधी दिली, मात्र घाणेरड्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला; संजय राठोड
- “साहेबांनी सांगितलं की, उद्या तु सभेला ये, भेटीनंतर मी समाधानी”; वसंत मोरे