मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पत्र लिहिल्यानंतर आता राज्यात लेटरवॉर सुरु झाल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर भाजपच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. भाजपच्या दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी यांच्या लेटरहेडवरुन हे पत्र पाठवण्यात आलं आहे.
‘सामना’चे धन्यवाद! चंद्रकांतदादांच्या लेखणीला फेस! अग्रलेखाला दिलेलं उत्तर जसंच्या तसं छापलं!
सावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का? असा सवाल या पत्रातून विचारला आहे. राज्यात महिला अत्याचार वाढत असताना, महिला असुरक्षित असताना दिल्लीत अधिवेशन बोलावण्याची मागणी करून राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न का करताय? असा खरमरीत सवाल या महिला आमदारांनी विचारला आहे.
सावित्रींच्या लेकींचे गाऱ्हाणे ‘मातोश्री ‘ ऐकणार का?
– राज्यात दररोज घडणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटनांकडे माननीय मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्या महिला आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
-कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा शिवछत्रपतींनी कसा सन्मान ठेवला हे आपल्याला ठाऊक आहे. आपण राज्याचे प्रमुख असताना राज्यातील लेकीबाळींचा असाच सन्मान राखला जावा अशी आपली इच्छा नाही का?
-आपल्याला राज्यातील बऱ्याच घटनांची माहिती नसते असे कळते . त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपणास पत्राद्वारे कळवीत आहोत.
-साकीनाक्यानंतर महाराष्ट्रात घडलेल्या काही घटना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या नसाव्यात असे दिसते. पोचल्या असल्या तरी त्याची गंभीरता आपल्या कार्यालयाला कळली नसावी.
-राज्यातील महिला भयंकर असुरक्षिततेच्या वातावरणात वावरत असताना संसदेच्या अधिवेशनाची मागणी करून राज्याची अब्रू थेट दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न आपण का करत आहात?
-केंद्र सरकारकडे बोटे दाखवून अशा घटनांची जबाबदारी महाराष्ट्र सरकारला टाळता येणार नाही.
अन्यायग्रस्त महाराष्ट्रातील हतबल सावित्रीच्या लेकी,
आ.माधुरी मिसाळ
आ. विद्या ठाकूर
आ.प्रा.देवयानी फरांदे
आ.मनिषा चौधरी
आ.सीमा हिरे
आ.श्वेता महाले पाटील
आ.मेघना साकोरे बोर्डीकर
आ.डॉ.नमिता मुंदडा
आ.मंदा म्हात्रे
आ.भारती लव्हेकर
आ.मोनिका राजाळे
आ.मुक्ता टिळक
Read Also :
- मी कुठलीही गोष्ट चुकीची केलेली नाही, सोमय्या विनाकारण प्रतिमा मलिन करतायतं – अनिल परब
- शरद पवारांनी नव्हे काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला – रामदार आठवले
- पुण्यातील ॲमिनिटी स्पेसच्या मुद्यावरुन भाजप बॅकफूटला; राष्ट्रवादी काँग्रेसकडून निर्णयाचे स्वागत
- मुंबई पोलिसांनी २४ तासाच्या आता माझी माफी मागावी – किरीट सोमय्या
- सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी; चंद्रकात पाटलांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली