नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त असलेले आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यात सीबीआय संचालकपदाच्या नियुक्तीसंदर्भात चर्चा झाली होती. यापदासाठी अनेक नावे चर्चेत होती. अखेर या आता सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागली आहे.
IPS Subodh Kumar Jaiswal has been appointed as Director of Central Bureau of Investigation (CBI) for a period of 2 years pic.twitter.com/jFGwZbOen4
— ANI (@ANI) May 25, 2021
सुबोध जयस्वाल हे 1985 च्या बॅचमधील अधिकारी आहेत. आता ते पदभार स्वीकारल्यापासून 2 वर्ष सीबीआयचे संचालक म्हणून कार्यरत असतील. ते महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक आणि मुंबई माजी पोलिस आयुक्तही आहेत.महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून त्यांचे आणि ठाकरे सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले होते. 2020 अखेरीस त्यांची सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
सीबीआयचे संचालक पद हे फेब्रुवारीपासून रिक्त आहे. या पदासाठी उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक एच. सी. अवस्थी, सशस्त्र सुरक्षा दलाचे महासंचालक कुमार राजेश चंद्रा आणि गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. एस. के. कौमुदी यांची नावं चर्चेत होती.
Read Also :
- तरुणाची गांधीगिरी, रुग्णांना लुटणाऱ्या हॉस्पिटलविरोधात केले ‘अर्धनग्न’ आंदोलन
- ‘गृह विलगिकरण बंद करण्याचा निर्णय व्यवहार्य नसून त्याचा पुनर्विचार करावा’
- ‘…अन्यथा लॉकडाऊन वाढवला तरी आम्ही झुगारुन दुकानं सुरु करु’
- ‘राहुल गांधींना ‘पंतप्रधानपदी’ पाहणे म्हणजे मोदींना ‘पंतप्रधान’ म्हणून कायम ठेवण्याचा प्रयत्न’
- ‘… तर गंगेत इतके शव वाहताना पाहावे लागले नसते’, यशोमती ठाकूर यांची मोदींवर टीका