मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडाळातील मंत्र्यांना काल खातेवाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचं अर्थ, दिलीप वळसे पाटील यांचं गृह, जयंत पाटील यांचं जलसंपदा आणि जितेंद्र आव्हाड यांचं गृहनिर्माण खातं स्वत:कडे ठेवत सूचक संदेश दिला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर शिंदे गटाला फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम करण्यात आलं अशी टिका देखील राष्ट्रवादीने केली आहे. यातच आज भाजपचे नेते आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय खातं सोपवण्यात आलं असून त्यांनी सांस्कृतिक विभागाअंतर्गत महत्वाची घोषणा केली आहे.
“अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा, पण सध्या…;”; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
आताच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप करण्यात आलं. आजपर्यंत आपण इंग्रजांनी दिलेले शब्द आपण वापरत आलो आहे. ते म्हणजे जेव्हा आपण मोबाईल, फोन उचलतो तेव्हा आपण हॅलो म्हणतो. इंग्रजांनी दिलेला हा शब्द जेव्हा दिला, तेव्हा हा देश गुलाम होता. स्वांतत्र्यविरांनी तिरंगा हातात घेऊन वंदे मातरम म्हणत आपल्या हातात नव्या संकल्पाच्या रूपात दिलं. परंतु अजूनही इंग्रजांची छाप कमी होत नाही. त्यामुळे आज सांस्कृतिक विभागाचा पहिला संकल्प म्हणून करतो की आजपासून हॅलो नाही तर वंदे मातरम म्हणायचं असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
“बावनकुळे खुप मेहनती, त्यांनी बायको पळवून आणली”; गडकरींची जोरदार टोलेबाजी
मोबाईलवर आता आजपासून हॅलो नाहीतर वंदे मातरम म्हणूया. सांस्कृतिक विभागाच्या माध्यामातून हा अभियान पंधरा ऑगस्टपासून ते पुढच्या 26 जानेवारीपर्यंत करूया, असं आवाहन देखील मुनगंटीवार यांनी केलं. भारतामातेचा तिंरगा ध्वज आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हातात दिला आहे. आज आपण म्हणूया. उद्या जिल्हा तर महाराष्ट्र असं करत करत संपुर्ण भारत वंदे मातरम म्हणेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर ंकोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग देण्यात आलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहे. भाजप नेते आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्याकडे सहकार खाते देण्यात आले आहे. केंद्रात आणि राज्यात सहकार खाते भाजपच्या वाट्याला आल्याने भविष्यात या विभागाद्वारे महत्वाचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आंभाजप नेते आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्याकडे सहकार खाते देण्यात आले आहे. केंद्रात आणि राज्यात सहकार खाते भाजपच्या वाट्याला आल्याने भविष्यात या विभागाद्वारे महत्वाचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.
Read also
- “राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या अनेकांच्या फडणविसांनी सुरूवातीलाच मुसक्या आवळाल्या”
- घराणेशाहीच्या वक्तव्यावर अजित पवारांचं मोदींना सडतोड प्रत्युत्तर, म्हणाले, “बळजबरीने पदावर बसलं तर..;”
- “खातेवाटपात भाजपने शिंदेंवर लिंबू मिर्ची फिरवली?” शिवसेनेची भाजपवर जहरी टिका
- “मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला फक्त पाने पुसली”
- नरेंद्र मोदींचा घराणेशाहीवर हल्लाबोल; लाल किल्ल्यावर मोदींचं दमदार भाषण