पिंपरी-चिंचवड : अजित पवार गटातील शहाराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने महाविकास आघाडीत धुसफुस सुरू झाली आहे. अजित गव्हाणे यांच्यामुळे ठाकरे गटांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातच भोसरी विधानसभेची जागा कुणाला जाणार ? याची चर्चा सुरू असताना स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यामध्ये ठाकरे गटाकडून इच्छूक असलेल्या सुलभा उबाळे यांनी तर अजित गव्हाणे यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे.
अजित गव्हाणे यांच्या प्रवेशानंतर ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यातच आज मुंबईत सुलभा उबाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, आता काही लोकांनी तिन्हीही पक्षांकडे जॅक लावून ठेवला आहे. एका पक्षात राहुन तिन्ही पक्षाकडे प्रयत्न करताहेत. अशा लोकांना यावेळेस छोबीपछाड मिळणार आहे. यातच कुठलाही पक्ष असेल त्याला याठिकाणी मेरिटवर जागा मिळेल, असा विश्वास सुलभा उबाळे यांनी व्यक्त करत अजित गव्हाणे यांना कडक इशारा दिलाय.
हेही वाचा..विधानसभेत रंगणार राजकारणाचा फड, जिल्ह्यातील २१ मतदारसंघात इच्छूकांची हवा
दरम्यान, शहरात घडलेल्या घडामोडीनंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सचिन अहिर यांनी पिंपरी चिंचवडमधील प्रमुख नेत्यांना मुंबईतील शिवसेना भवन येथे बोलवले. भोसरी विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाने आपल्याकडे ठेवावा अशी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची मुंबईतील ‘२५’ जागांवर नजर ; महाविकास आघाडीत केला मोठा दावा
हेही वाचा..जरांगे पाटलांचा तोल सुटला, प्रसाद लाड यांना शिवीगाळ, काय काय म्हणाले..?