मुंबई : लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या सुनेत्रा पवार यांनी आझ अखेर राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेची जागा रिक्त होती. त्यानंतर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर अजित पवार यांचं मुळ गाव असलेल्या काटेवाडी गावात समर्थकांकडून गुलाल उधाळण्यात आला.
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का, फायर ब्रॅंड नेत्या रूपाली पाटील पक्षाला देणार सोडचिठ्ठी ?
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटची तारिख होती. त्यानंतर आज सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे. यावर बोलतांना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिल्याने पक्षाची तसेच कार्यकर्त्याचे आभार मानते. अशी नाराजी कुठल्याही दिसली नाही. असेही त्यांनी स्पष्ट केलं.
सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आहे. भुजबळ साहेब देखील माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजर होते. त्यामुळे पक्षात कुणीही नाराज नाहीत असं वाटतं. जनतेतून मागणी होत होती. लोकसभेची उमेदवारी देखील जनतेतूनच पहिल्यांदा मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यसभेची उमेदवारी देखील जनतेनीच मागणी केली आहे. असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, बारामती लोकसभेत सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळे यांनी दारूण पराभव केला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेऊन राज्यमंत्री करा. अशी मागणी करण्यात आली. त्याचा ठराव देखील अजित पवार गटाने मंजूर करून घेतला. तर यानंतर आता सुनेत्रा पवारांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर काटेवाडीत अजित पवार समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.
READ ALSO :
हेही वाचा…विधानसभेच्या २०० ते २५० जागा मनसे स्वबळावर लढणार ? महायुतीची चिंता वाढली ?
हेही वाचा…“लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, अजित पवार गटाचा आरएसएसवर पलटवार
हेही वाचा..“मोदी, शाह सोडाच परंतु मोहन भागवत देखील मणिपुरला गेले नाहीत”, राऊतांचा टोला