म्हापसा : ‘गोव्यात सुरू असलेल्या विकासासाठी तसेच म्हापशातील विकास पुढे नेण्यासाठी भाजपचे हात मजबूत करण्यासाठी जोशुआ डिसोजा यांना पुन्हा विधानसभेवर पाठवण्याची गरज आहे’ असे प्रतिपादन अभिनेता किशन कुमार यांनी केले.
‘लांडेवाडीच्या घाटात या’ मग बघू कोण कोण बसतंय घोडीवर? शिवाजीराव आढळरावांचे कोल्हेंना खुले आव्हान
किशन कुमार तसेच वसई-विरारचे भाजपाचे महामंत्री उत्तम कुमार यांनी म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासमवेत प्रभाग क्रमांक १८ या फेअर बाईश परिसरातील प्रचारात भाग घेतला. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेण्यात आल्या. यावेळी किशन कुमार बोलत होते.
तुम्ही मुंबईचे दादा मातोश्रीपुरतेच आहात; नारायण राणेंचा संजय राऊतांना खोचक टोला
‘गोव्याची गणना देशातील उत्कृष्ट राज्यांत केली जाते. गोवा राज्य उत्कृष्ट बनवण्यासाठी येथील भाजपा सरकारने साधलेला विकास कारणीभूत ठरला आहे. हा विकास पुढे नेऊन गोव्याला देशातील उच्चतम स्तर गाठून देण्यास भाजपा सरकार पुन्हा सत्तेवर येण्याची गरज आहे’ असे कुमार यांनी उत्तम कुमार यांनी म्हापशातून झालेला प्रचार पाहता जोशुआ निश्चित निवडून येतील,’ असा दावा केला. नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, मंडल अध्यक्ष सुशांत हरमलकर तसेच इतर अन्य कार्यकर्त्यांसमवेत प्रकार करणाऱ्या जोशुआ यांनी प्रचारावर समाधान व्यक्त केले.
Read also:
- अमरावतीत आयुक्तांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी; आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल
- पंतप्रधान मोदींची आज म्हापश्यात जाहीर सभा; भाजपकडून जंगी तयारी
- नागपूरात नितीन गडकरींच्या घराबाहेर आंदोलन; भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
- मुंबईत शिवसेनाच दादा आहे, टीका करायचं काही कारण नाही; संजय राऊतांनी पुन्हा ठणकावलं
- एकनाथ शिंदेचा वाढदिनीच भाजपला जोरदार धक्का; भाजपच्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश