सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास न्यायालयाने सीबीआयकडे सोपवलेला असताना भाजप नेत्यांकडून वारंवार या प्रकरणाबाबत अनेक नवं नवीन विधाने होताना दिसत आहेत. नुकतच भाजपाचे प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी एका युवा नेत्याकडे नाव न घेता या नेत्याच्या हालचालींबाबत एक भाकीत व्यक्त केले आहे. हा नेता ईमेज चमकविण्याच्या उद्देशाने मोठ्या तयारीनिशी स्वत: सीबीआयच्या समोर जाण्याची शक्यता नखुआ यांनी व्यक्त केली आहे.
सीबीआयने न बोलवताही एक युवा नेता स्वतःहून पुढील एक दोन दिवसांमध्ये या प्रकरणाबाबत सीबीआयकडे जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली असल्याचे नखुआ यांनी म्हंटले आहे. तसेच या सर्व गोष्टींसाठी एक प्लॅन आखला जात असल्याचे देखील नखुआ यांनी सांगितले आहे. मात्र त्या युवा नेत्याचे नाव घेणे त्यांनी यावेळी टाळलेले आहे.
हा युवा नेता सुशांत प्रकरणात हे सिद्ध करू इच्छित आहे की, त्याने काही केलेले नाही. यामुळे स्वत: सीबीआयच्या समोर हजर झालो. कोणाचे नाव घेत नाही, पण सर्वकाही आपोआपच समोर येईल, असे ते म्हणाले.
Extremely Reliable Sources : A young politician might present himself before CBI suo moto today or tomm.
Massive PR strategy being planned.
— Suresh Nakhua 🇮🇳 ( सुरेश नाखुआ ) (@SureshNakhua) August 21, 2020