सुशांत सिंह प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सुशांत सिंहच्या पूर्वीची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केलेली नाही, तर तिची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे,” असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
सुशांतची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन हिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या. तिला भगवती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ८ तारखेला तिने आत्महत्या केली, शवविच्छेदन ११ तारखेला केलं. पोलिसांनी या आत्महत्येबद्दल अधिक माहिती का घेतली नाही. पार्टीला असलेल्यांपैकी तिच्याशी किती जणांचा संबंध आहे. मला अशी माहिती मिळाली की, तिच्या शवविच्छेदनामध्ये असं दिसून आलं की तिनेही आत्महत्या केलेली नाही. तिची पण हत्या आहे. तिच्यावर बलात्कार करून तिला मारलेलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आढळल्या आहेत. या जखमा वरून पडून होत नाही. अशावेळी शवविच्छेदन बलात्कार झाला की नाही, हे तपासण्यासाठीच केलं जातं. ते लवकरच बाहेर येईल,” असं नारायण राणे म्हणाले.
मुंबईतील भाजपा मुख्यालयात नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांनी सुशांत सिंह प्रकरणाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर त्याच्या पूर्वीच्या मॅनेजरचीही हत्या करण्यात आलेली असल्याचं म्हटलं आहे