अभिनेता सुशांतसिंग राजपूतने अतिशय कमी वयात जगाचा निरोप घेतला. बॉलिवूडने एक हरहुन्नरी कलाकार गमावला. तर सुशांतच्या कुटुंबियांनी आपला लाडका मुलगा. सुशांतच्या बहिणींसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. ३ ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे. बहिण – भावाचं नातं अधिक गहिरं करणारा हा सण. सुशांतच्या बहिणींना यावेळी त्यांचा लाडका भाऊ राखी बांधण्यासाठी नसणार आहे. मात्र या सणाच्यानिमित्ताने आमच्या भावाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशी मागणी त्याच्या बहिणींनी केलेली दिसते.
सुशांतला एकूण चार बहिणी आहेत. मोठी बहिण श्वेता किर्ती सिंह जी अमेरिकेला राहते. तर दुसरी बहिण मीतू सिंह ही मुंबईतच वास्तव्याला आहे. तर नीतू आणि प्रियंका अशा इतर दोन बहिणींची नावे आहेत. सर्वात शेवटी सुशांतचा नंबर लागतो. प्रियंका सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. मोठी बहिण श्वेतासिंहने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो ट्विट केला होता, ज्यामध्ये सुशांतने व्हाईट बोर्डवर तो २९ जूनपासून ध्यानधारणा करणार असल्याचे लिहिले होते.