जालना : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालायची बेकायदेशीर झडती घेणे पोलीस कर्मचाऱ्यांना महागात पडले आहे. दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीरपणे झडती घेतल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
बेकायदेशीर झडती घेतल्याने जाफराबाद ठाण्यातील दोन पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी आज तडकाफडकी निलंबित केले आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल सचिन तिडके, पोलीस कॉन्स्टेबल शाबान जलाल तडवी यांचं निलंबन करण्यात आलं आहे
अवैध वाळू उपशाची बातमी प्रसिध्द करणाऱ्या एका पत्रकारास जाफ्राबाद येथे मारहाण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील संशयित आरोपी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या संपर्क कार्यालयात लपून बसल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कुठल्याही परवानगी शिवाय झाडाझडती घेतली होती.
याप्रकरणी पोलीस खात्याची जनसामन्यात प्रतिमा मलीन झाली असून कायद्याचे पूर्ण ज्ञान असताना देखील कर्तव्यात बेकायदेशीर व अत्यंत बेशिस्तपणाचे वर्तन केले म्हणून ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलिस अधिक्षकांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
Read Also :
- ‘नाना, काँग्रेसला हे दोन्ही पक्ष भीक तरी घालतात का?’
- ‘राम मंदिराच्या नावाने चंदा, हाच भाजप आणि आरएसएसचा धंदा’
- ‘दोन्ही राजे एकत्र आल्याचे स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं’
- ‘मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा’
- केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांच्या चर्चा, प्रीतम मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागणार ?