उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करुन फरार झालेला गँगस्टर विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे. अभिनेत्री तापसी पन्नूने देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे.
तापसी म्हणते,’असं होईल याचा विचारही आम्ही केला नव्हता. आणि मग सगळे म्हणतात की बॉलिवूड चित्रपटांच्या कथा या वास्तवदर्शी नसतात, जे समाजात घडत तेच आम्ही चित्रपटामध्ये दाखवितो ‘ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.तापसी पन्नूने ट्विटरद्वारे विकास दुबे एन्काऊंटरवर प्रतिक्रिया दिली आहे.
Wow! We did not expect this at all !!!! 😳
And then they say our bollywood stories are far from reality 😏 https://t.co/h9lsNwA7Ao— taapsee pannu (@taapsee) July 10, 2020
दरम्यान. गँगस्टर विकास दुबेवर अनेक लोकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून राग व्यक्त केला आहे. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सगळ्यांनीच त्याच्यावर प्रतिक्रिया देत ट्विट केलं आहे. सगळ्यांची एकच मागणी होती की त्याला मारलं जावं. आता जेव्हा विकासचं एनकाउंटर करण्यात आलंय तेव्हा देखील अनेकांनी यावर त्यांचं स्पष्ट मत मांडलंय.