रत्नागिरी : हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा’ असा जोरदार हल्ला केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. राणे यांनी आपल्या ‘प्रहार’ वर्तमानपत्रामधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हा निशाणा साधला आहे.
साखर कारखान्यांना ईडीने नोटीसा बजावल्या, पण त्यांच्यावर कारवाई होणार नाही – देवेंद्र फडणवीस
‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा’ अशा मथळ्याखाली नारायण राणेंचा घणाघाती प्रहार वाचा उद्याच्या अंकात असे सदर छापून आले आहे. प्रहार पेपरच्या पहिल्या पानावर हा मथळा छापण्यात आला आहे. तेव्हा उद्याच्या अंकात ‘हार आणि प्रहार’ या शिर्षकाखाली नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला करणार असल्याचे दिसून येत आहे.
महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं, आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात अपेक्षेप्रमाणे राजकीय जुगलबंदी रंगताना पाहायला मिळाली. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी सर्वांदेखत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अनेक मुद्द्यांवरुन लक्ष्य केले. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या पहिल्याच वाक्यापासून नारायण राणे यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले.चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही, आनंद व्यक्त करण्याचा आहे. कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडं उगवतात. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
अजिबात टेंन्शन घेवू नका, महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येत नाही – राजेश टोपे
नारायण राणे यांनी व्यासपीठावरून हाणलेल्या जवळपास प्रत्येक टोल्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिटोला लगावला. काही लोक पाठांतर करुन बोलतात, पण अनुभवाने बोलणं वेगळं असतं. मनातील मळमळ बोलून दाखवणे हे तर त्यापेक्षाही वेगळं असतं. आज या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून एक काळं तीट असावं लागतं, तशीच काही लोकं आज याठिकाणी आहेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
Read Also :
- भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढणार, गरीबांना लुटणाऱ्यांना आमचं सरकार सोडणार नाही – नरेंद्र मोदी
- अजितदादा, मला परवानगी द्या, त्या किरीट सोमय्याला बघून घेतो – आमदार शशिकांत शिंदे
- शिवसेनेला लागली साडेसाती? एकनाथ शिंदे यांची ज्योतिषाकडे धाव, तर्कवितर्कांना उधान
- शिवसेना खासदार भावना गवळींना चिकन गुनियाची लागण; ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाहीत!
- आर्यन खानला आज जामीन मिळावा, हीच माझी प्रार्थना आहे; भाजप आमदार राम कदम