मुंबई : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने अजित पवार यांच्यासह भाजपला खडेबोल सुनावल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे. यावरून राज्यात आता एकमेकांवर टिका टिप्पणी सुरू झाली आहे. अशातच केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी एक पोस्ट करत याबाबत मोठं भाष्य केलं आहे. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यावर केलेली कमेंट सध्या चर्चेची विषय ठरली आहे.
हेही वाचा…“लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, अजित पवार गटाचा आरएसएसवर पलटवार
स्वयंसेवक संघांशी संबंधित असलेल्या ऑर्गनायझर मासिकात प्रकाशित झालेल्या एका लेखावरून राज्यात मोठा वांदग पेटला आहे. त्यावरून राज्यात आता एकमेकांवर जोरदार टिकास्त्र सोडलं जात आहे. अशातच केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी एक पोस्ट केली आहे. त्यात अजितदादाला घेतल्याने संघ बाटला असे आरएसएसला वाटते आहे. परंतु ते ऐकून दादांना काय वाटते ते आता आम्हाला ऐकायचे आहे. असं पाटील यांनी म्हटलंय. त्यावर माझी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी फार नेमक्या आणि मोजक्या शब्दात संघ विचारसरणी बहुजनाबद्दल काय विचार करते ते मांडले आहे. अशी टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केलीय.
दरम्यान, अलिकडेच सुर्याकांता पाटील यांनी शरद पवारांबाबत देखील एक भाष्य केलं होतं. त्यावेळी माझंच चुकलं होतं. तेव्हा शरद पवारांची साथ सोडायला पाहिजे नव्हती. परंतु माझ्यावर अन्यायच तेवढा झाला होता. त्यामुळे माझ्याकडे काहीच पर्याय शिल्लक नव्हता. असेही त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर राज्यात त्यांची एकच चर्चा झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एक पोस्ट करत खळबळ माजवून दिलीय.
माझी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी फार नेमक्या आणि मोजक्या शब्दात संघ विचारसरणी बहुजनाबद्दल काय विचार करते ते मांडले आहे. pic.twitter.com/SRtQa1F64N
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) June 13, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“काहीही झालं तरी मला महाराष्ट्राचं राज्य हातात घ्यायचंय”, शरद पवारांनी ठोकला शड्डू
हेही वाचा..“अखेर सुनेत्रा पवारांसाठी काठेवाडीत गुलाल उधळला, राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल
हेही वाचा…विधानसभेच्या २०० ते २५० जागा मनसे स्वबळावर लढणार ? महायुतीची चिंता वाढली ?