तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता उपचार सुरु करण्यात आले आहेत. राज्यपालांच्या संपर्कात जे लोक आले होते त्यांचीही कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
याबाबत कावेरी हॉस्पिटलने मेडिकल बुलेटीनही जारी केलंय. पुरोहित यांना फारशी लक्षणे दिसत नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आलं असून त्यांच्यावर डॉक्टरांचा पथक लक्ष ठेवून असल्याचींही हॉस्पिटलने म्हटले आहे.रविवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्विट केल्यानुसार – त्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसून येत होती. त्यांनी चाचणी केल्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांनी पुढे लिहिले आहे की – त्यांची तब्येत ठीक आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात भरती करण्यात येत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.