तामिळनाडू : भारताचे सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. १४ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घ्यायच्या तर संपूर्ण निवडणूका घ्या, अन्यथा पुढे ढकला; मंत्री छगन भुजबळ आक्रमक
हेलिकॉप्टर दुर्घटनेत १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली आहे. यासंदर्भात राजनाथ सिंह सविस्तर माहिती उद्या संसदेत देतील असेही समजते.
13 of the 14 personnel involved in the military chopper crash in Tamil Nadu have been confirmed dead. Identities of the bodies to be confirmed through DNA testing: Sources
— ANI (@ANI) December 8, 2021
लष्करप्रमुखांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याकारणाने राजभवनमधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणारा दरबार हॉलचा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. अशी माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली. त्यामुळे या भीषण हेलिकॉप्टर अपघातानंतर राष्ट्रपतींनीही आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केल्याचे दिसून येत आहे. आपघात जखमी झालेले सीडीएस बिपीन रावत यांच्या दिल्लीतील घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे राजनाथ सिंह यांनी सुरक्षादलाची बैठकही घेतली आहे.
Read Also :
- जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार-खासदारांमध्ये खडाजंगी; शिवसेनेतील अतर्गत वाद चव्हाट्यावर
- उपमहापौर व भाजप नगरसेवक राजेश काळे यांना दोन जिल्ह्यातून केले तडीपार
- सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे काही ‘पक्षी’ कोलकात्याहून येतात, काही दिल्लीहून येतात…
- मनसे-भाजप एकत्र येणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं मोठं विधान
- राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; होर्डिंगवरून फोटो गायब