अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तहसील कार्यालयातील तहसीलदार ज्योती देवरे यांची लोकप्रतिनीधीच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. दरम्यान ती ऑडिओ क्लिप माझीच असून मला लोकप्रतिनिधी यांच्याकडून त्रास दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यामुळे, भारतीय जनता पक्षाचे महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ या सुपारी घेऊन काम करत असल्याचा आरोप शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी केला आहे. तशी चर्चा देखील तालुक्यात सुरू असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली आहे. त्यामुळे, या प्रकरणाला राजकीय गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व्हायरल ऑडिओ क्लिपवर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या…
ज्योती देवरे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे भाजपाच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेत लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या!
दरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या तहसीलदार देवरे यांचे समर्थन करणारे चित्रा वाघ यांनी सुपारी घेऊन या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप संजीव भोर यांनी केला आहे. त्यांनी बोलताना सागितले की पारनेर तालुक्यातील तहसीलदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी देखील कामात अनियमितता असल्याचा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांना पाठवला होता.
“रडायचं नाही…भिडायचं आणि जिंकायचं, तहसीलदार ताई आम्ही तुमच्या सोबत”
त्याचंप्रमाणे तहसीलदार देवरे यांच्या विरोधात संपूर्ण तलाठी संघटना, तहसील कर्मचारी संघटना हे आंदोलने करून त्यांच्या बदलीची मागणी करत आहे. आणी असं असतांना देखील चित्रा वाघ भ्रष्ट अधिकाऱ्याचा बचाव करत या प्रकरणाला राजकीय वळण देत असल्याने चित्रा वाघ यांनी सुपारी घेऊन या प्रकरणात लक्ष घातल्याची चर्चा पारनेर तालुक्यात जोर धरू लागली आहे अशी माहिती शिव प्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी दिली आहे.
Read Also :
- “राणेंची यात्रा ‘जन आशीर्वाद’ नाही, ती तर…”, संजय राऊतांनी पुन्हा एकदा डिवचले
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीय, मी एकटा काय करू? – अण्णा हजारे
- पोलीस आणि गुंडांच्या जोरावर महाविकास आघाडी सरकार चाललंय – चंद्रकांत पाटील
- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत – उद्धव ठाकरे
- देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा; शिवसेना- भाजपात नेमंक काय चाललयं?