मुंबई: तब्बल १९ वर्षांनंतर ठाकरे बंधू, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज वरळीतील डोममध्ये एकाच मंचावर आले. या ऐतिहासिक विजयी मेळाव्याला राज्यभरातून लाखो शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती, ज्यामुळे वरळी डोम पूर्णपणे भरून गेला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपली आक्रमक भूमिका मांडत सरकारला धारेवर धरले.
हेही वाचा…‘जय महाराष्ट्र’ मेळाव्यात भरत जाधव यांची सुशील केडियांच्या ट्विटवर प्रतिक्रिया: “मराठी माणसाने जागे व्हायला हवं!”
“वापरायचं आणि फेकायचं, आता आम्ही दोघं वापर करून फेकणार आहोत!”
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले, “राज आणि मी अनुभव घेतला आहे या नतद्रष्टांचा. वापरायचं आणि फेकायचं. आजपर्यंत वापर करून घेतला. आता आम्ही दोघं वापर करून फेकणार आहोत.” हे विधान त्यांनी भाजपवर निशाणा साधत केले. ठाकरे यांनी भाजपला प्रश्न विचारला, “अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं महाराष्ट्रात? कोणत्या भाषेत बोलत होता? राज तू सर्वांची शाळा काढली. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे, मोदींची शाळा कोणती? सर्वच उच्चशिक्षित आहेत.” भाजपला ‘अफवांची फॅक्ट्री’ संबोधत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर हिंदुत्वावरून टीका केली. “भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे. मधल्या काळात सुरू केलं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे कडवट हिंदुत्ववादी आहोत. तुम्ही काय हिंदुत्व शिकवता? ९२-९३ साली माझ्या शिवसैनिकांनी वाचवलं,” असे सांगत त्यांनी भाजपचे हिंदुत्व बेगडी असल्याचे म्हटले.
हेही वाचा…ठाकरे बंधू अठरा वर्षांनी एकत्र: मराठी विजय मेळावा ठरणार ‘सुवर्ण क्षण’
“आहोत आम्ही गुंड, न्याय मिळवण्यासाठी गुंडगिरी करूच!”
देवेंद्र फडणवीस यांच्या ‘भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही’ या विधानाचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, “फडणवीस म्हणाले, भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंडगिरी म्हणत असाल, तर आम्ही गुंड आहोत. आहोत आम्ही गुंड! न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी आहे. गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल, तर गुंडगिरी करूच. हे राजकीय बाडगे आहेत.” या मेळाव्यातून ठाकरे बंधूंनी एकत्र येत महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू केल्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या एकत्रित आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापले: राणे-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राऊतांकडून माफीची मागणी!
मुंबईत ‘ठाकरे’ एकजुटीचा विजयी मेळावा: राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल, ‘बूट चाटण्या’चा टोला!
पुण्यात अमित शाहंकडून बाजीराव पेशव्यांना मानवंदना: “एकही युद्ध न हरलेला एकमेव सेनापती!”