मुंबई : काल माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखांची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात त्यांनी भाजपचा उल्लेख कमळाबाई तर शिंदे गटाचा मिंधे असा उल्लेख केला. तर गिधाड, कोतळा असा शब्दाचा प्रतिकार करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर देखील जोरदार प्रहार केला. यावरून त्यांना भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.
“शिवसेना फुटल्याचं दु:ख आहे , तुम्हाला राष्ट्रवादी जवळची की पन्नास आमदार?” रामदास कदम
भाजपचे नेते केशव उपाध्यय यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, पेंग्विन सेनाप्रमुखांनी काल पुन्हा आपले पोकळ दंड पसरून त्याच गुळमुळीत आवेशाचे दर्शन घडवले. त्यांची नजरही आता भ्रष्ट झाल्यामुळे गिधाड आणि गरूड यांच्यातला फरक त्यांना कळत नाही. अमित शहा हे गरूड आहेत. किमान तेवढा तरी परत पाहा. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
महापालिका निवडणुक आली की गिधाडांना मुंबई दिसते, कारण ती त्यांच्यासाठी स्केअर फुटाने विकण्याची जागा आहे. आमच्यासाठी ती 105 वीरांच्या बलिदानातून मिळवलेली मातृभूमी आहे. ती आमची आई आहे आणि आईवर वार करायला आलेल्यांचा कोथळा आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या शहरप्रमुख पदी गिरीश खत्री यांची निवड
हिंमत असेल तर, पुढच्या महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणुक घ्या अन् आणखीनच हिमंत असेल तर त्या सोबतच विधानसभेची निवडणुक घेऊन दाखवा. तुम्ही आम्हाला जामीन दाखवण्याची भाषा करीत आहता. परंतु आम्ही तुम्हाला आसमान दाखवल्य़ाशिवाय राहणार नाही. असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिलं आहे. तसेच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, अस देखील त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.
Read also
- शिवतीर्थावरील परवानगी ठाकरेंना नाकारली, अंधारे म्हणाल्या, “काल फक्त ट्रेलर होता, एवढ्यात घाबरलात ?”
- “उरलेला तुमचा करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
- “महापालिकेच्या सत्तेत असंख्य यशवंत, कीर्तिवंत भ्रष्टाचाराचे राक्षस उभे केलेत”; मनसेची टिका
- “हल्ली बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरतेय”; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा
- “निवडणुक आली की गिधाडांना मुंबई दिसते, हिंमत असेल तर, घ्या निवडणुक”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल