पुणे : पुण्यातील महामारीच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्यात आले होते. दरम्यान, या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, पुण्यातल्या महामारीच्या स्थितीची माहिती दिली असून, यामध्ये पुणेकरांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले आहेत.
पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे…
- पुण्यातील महामारीची परिस्थिती समाधानकारक आहे.
पुण्यात कालच्या दिवसात ५८८ बाधित रुग्णांची नोंद झाली असून, शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४ लाख ६८ हजार १२९ इतकी झाली आहे. तसेच, एकूण रुग्ण बरे होऊन घरी पाठवलेल्यांची संख्या ४ लाख ५१ हजार ९९१ झाली आहे. शहराची एकूण टेस्ट संख्या आता २४ लाख ६८ हजार ७०९ इतकी झाली आहे. दुसरीकडे उपचार घेत असलेल्या ७ हजार ९९० रुग्णांपैकी ९९६ रुग्ण हे गंभीर आहेत, तर १८६२ रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर आहेत आणि पुणे महापालिका हद्दीत महामारीने झालेल्या मृतांची एकूण संख्या ८ हजार १४८ इतकी झाली आहे.
- हॉस्पिटलमधील प्रत्येक बिल आता कडक पद्धतीने तपासण्याचे निर्देश
पुणे शहरात कोविड, तसेच खाजगी रुग्णालयांकडून महामारीच्या उपचारांसाठी आकारण्यात येणाऱ्या, प्रत्येक बिलाचं आता ऑडिटरद्वारे ऑडिट होणार आहे. आजवर दीड लाख रुपयांच्या वरच्याच बिलांचं ऑडिट केलं जात होतं. मात्र, आता प्रत्येक बिलाचं ऑडिट होणार असून, गैरप्रकार आढळून आल्यास काढलं कारवाई होणार.
- पुण्यात संस्थात्मक विलगीकरणावर भर देणार; गृह विलीगीकरणाचा टक्का घसरला
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असलेल्या १८ जिल्ह्यांतील गृह विलीगीकरण सुविधा पूर्णपणे बंद करून संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याचे आदेश राज्य सरकारने २ दिवसांपूर्वी दिले होते. त्यानुसार शहरातील गृह विलीगीकरण हळूहळू कमी केले जाणार आहे. राजेश टोपे म्हणाले, “पुण्यात ८०%पर्यंत गृह विलीगीकरणाच्या केसेस होत्या, त्याचे प्रमाण आता ५६% झाले आहे. हे प्रमाण अजून कमी म्हणेज २५-३०% आणण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास नवीन कोविड केअर सेंटर्स उभारून तिथे सर्व आरोग्यव्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल”, असं त्यांनी सांगितलं आहे.
- म्युकरमायोकसिसवर मोफत उपचार
शहरातल्या म्युकरमायकोसिसवर आजारावर उपचार देणाऱ्या रुग्णालयांसंदर्भात महत्वाची घोषणा यावेळी त्यांनी केली असून, पुण्यातील रुबी, जहांगीरसारख्या रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसवर उपचार केले जातात. मात्र, या रुग्णालयांचा सरकारच्या यादीमध्ये समावेश नसल्याने, इथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या रुग्णालयांचा समावेश देखील सरकारी यादीमध्ये लवकरच करण्यात येईल,” अशी घोषणा त्यांनी केली आहे.
- वीकेंड लॉकडाऊन उठवणार
पुण्यातली वाढत असणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्बंधांशिवायही शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा पुण्यात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता हे निर्बंध उठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Read Also :
- अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाचे रणशिंग फुकले; शिवसेना की काँग्रेस मिळणार सत्ता?
- हिंदुस्थान अँटिबायोटिक्स: रेमडीसेवीर इंजेक्शन, ब्लॅक फंगस औषधही निर्माण करणार, केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा
- ६ जूनपर्यंत ५ मागण्या पूर्ण करा, नाहीतर रायगडावरून आंदोलनाची सुरुवात!
- राम शिंदे यांनी कुकडीच्या पाण्याच्या बाबतीत हुरळून जाऊ नये; घनशाम शेलार यांचा सणसणीत टोला
- संभाजीराजेंनी मांडली निर्णायक भूमिका; पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे…