पुणे : महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे पहिल्यापासून इच्छुक असलेले राहुल कलाटे महाविकास आघाडीवर नाराज असल्याचं समजत आहे. त्यानंतर या पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज सादर करणार असं राहुल कलाटे यांनी म्हटलं. त्यानंतर यांनी राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीने आमदार सुनील शेळके पाठवले. तसेच ते विचारपुर्वक करून निर्णय घेतील, असं शेळकेंनी म्हटलं आहे. यावर आता अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुचना दिल्या आहेत.
हेही वाचा.. “राहुल कलाट्यांची राष्ट्रवादीकडून मनधरणी, सुनील शेळके कलाट्यांच्या भेटीला
राहुल कलाटेंना सांगण्याचं आम्ही काम करू, ऐकायचं नाही ऐकायचं हा त्यांचा निर्णय आहे. मला मात्र उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, आपला महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे यांना शिवसेनेचा स्पष्ट पाठिंबा राहील. एक नक्कीच सांगेन हलक्यात घेतली तर निवडणुक सोपी नाही. परंतु कष्ट घेतले तर निवडणुक अवघडही नाही. या शहराचा अनेक वर्षांपासून संबंध आहे. माझ्या राजकीय जीवनाची सुरूवातच पिंपरी चिंचवडमधून झाली आहे. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणुकीत आपचा नेता ठरला..; उमेदवारी अर्ज सादर करणार
दिवंगत आमदार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सलग तीन वेळा लक्ष्मण जगताप चिंचवडमधून निवडून आले आहेत. 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणुक लढविली होती. त्यावेळी त्यांनी फक्त 7841 मतांनी शिवसेनेचे सध्याचे खासदार अप्पा श्रीरंग बारणे यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी 2014 आणि 2019 साली सलग दोन वेळा भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढवून आमदार झाले होते. यातच त्यांनी अलिकडच्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी आजारी असतांनाही विधानभवनात येऊन मतदान केले होते. त्यामुळे सहाजिकच या निवडणुकीत अश्विनी जगताप यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता जास्त आहे.
हेही वाचा..चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कुणाचं पारडं जड..; राहुल कलाटे, नाना काटे, की अश्विनी जगताप ?
यातच 2014 ते 2019 मध्ये लक्ष्मण जगताप यांना राहुल कलाटे यांनी दोन्ही निवडणुकीत कडवी झुंज दिली होती. 2014 च्या विधानसभेत राहुल कलाट्यांना शिवसेनेने तिकीट दिलं होतं. त्यावेळी त्यांना 63, 489 मत पडली होती. त्यानंतर मात्र राहुल कलाट्यांचा जनमत मोठ्या प्रमाणात तयार झाला. 2019 च्या विधानसभेत भाजप-शिवसेनेची युती झाल्याने राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडूक लढविली. त्यांना यावेळी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यात त्यांना 1,12,225 मतं तर लक्ष्मण जगताप यांना 1,50,723 मत पडली होती. यातच राहुल कलाटे आणि लक्ष्मण जगताप अशीच लढत चिंचवडमध्ये आतापर्यंत बघायला मिळत आली आहे. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांच्या खालोखाल राहुल कलाटे यांचाच नंबर चिंचवडमध्ये लागतोय. यावेळी त्यांनीही अर्ज सादर केला आहे. त्यामुळे मतदारांचा कल त्यांच्याकडे अधिक असल्याचं दिसून येत आहे.
Read also
- हे सर्व वाद तात्पुरते असतात, नंतर सगळं ठीक होईल, पटोले थोरातांच्या वादावर सुशील कुमार शिंदेंचा विश्वास
- हेही वाचा..“भकास झालेल्या कसब्याला सजवायला येतोय,” अभिजीत बिचुकलेंनी दाखल केला कसब्यातून अर्ज
- हेही वाचा.. तब्बल 10 हजार रूपयांची चिल्लर घेऊन पोहचला, चिंचवडच्या अपक्ष उमेदवाराची कमाल, अधिकारी पैसे मोजून थकले
- हेही वाचा..“थोरातांचा राजीनामा अजित पवारांना माहिती, पण पटोलेंना नाही, आघाडीत नेमकं काय चाललंय?”
- हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये उंचीपेक्षा मोेठे स्थान देऊ, थोरातांना भाजपची ऑफर
- हेही वाचा.. ““याचे परिणाम भोगावे लागतील”, संभाजी राजेंचा आव्हाडांना कडक इशारा