मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू करून दिलीय. याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे सध्या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यानिमित्त ठाकरे इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यावरून श्रावणामध्ये उद्धव ठाकरे सोनिया दर्शन करण्यासाठी दिल्लीत गेले आहेत. असा टोला भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे यांना लगावला आहे.
हेही वाचा…३० वर्षांचा माढ्याचा किल्ला यावेळी ढासळणार ? शरद पवारांची ‘तुतारी’ माढ्यात वाजणार ?
प्रवीण दरेकर म्हणाले की, श्रावणामध्ये लोकं देवदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. परंतु उद्धव ठाकरे तीन दिवसाकरीता दिल्लीत सोनिया दर्शन करण्यासाठी गेले आहेत. एकीकडे दिल्लीचेही तक्त राखतो, महाराष्ट्र माझा, अशी भीमदेवी थाटात घोषणा करायची, अन् दुसऱ्या बाजूला दिल्लीश्वरांच्या पायाशी जाऊन लोटांगण घालायचे आणि त्यानंतर टिका, टिप्पणी, टोमणे मारायचे. आता ते तीन दिवस दिल्लीश्वरांच्या फेटा घालत आहेत. त्यासंदर्भात आपण महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला काय सांगणार ? असाही सवाल त्यांनी केलाय.
हेही वाचा..राहुल गांधींची सभागृहात जात विचारली, कॉंग्रेसची भाजपच्या विरोधात राज्यात निदर्शने
दरम्यान, उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीत देवदर्शनाला गेले आहेत. आता राहुल गांधी, सोनिया गांधी हे त्यांचे देव आहेत. उद्धव ठाकरे यांचे ह्यदयसम्राट आता राहुल गांधी असून मॉंसाहेब सोनिया गांधी झाल्या आहेत. शिवसेनाप्रमुखांचे विचार उद्धव ठाकरे यांनी पायदळी तुडवले आहेत. दिल्लीसमोर ते लाचार झाले आहेत. अशी टिका शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी केलीय. संजय शिरसाट आणि प्रवीण दरेकर यांच्या टिकेला आता ठाकरे गट कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आरोप सिद्ध करा, राजकारण सोडून देतो,” अजितदादांचा सुप्रिया सुळेंना चॅलेंज
हेही वाचा..“फुकटच्या गोष्टी करून कुणी कुणाला संपवू शकत नाही”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला