मुंबई : शिक्षण घेण्यासाठी वय कधीच अडचण ठरत नाही, असे म्हटले जाते. इच्छाशक्ती असल्यास, व्यक्ती कोणत्याही वयात आपले शिक्षण पुर्ण करण्याचे स्वप्न पुर्ण करू शकते. याचेच उदाहरण राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांसमोर ठेवले आहे.
एकनाथ शिंदे कला शाखेतून 77.25 टक्के गुण घेऊन पदवीधर झाले आहेत. वयाच्या 56व्या वर्षी त्यांनी ही पदवी घेतली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये ठाण्यातील ज्ञानपीठ विद्यालयाचा निकाल यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा 100 टक्के लागला आहे. या विद्यालयातून एकनाथ शिंदेंनी पदवी मिळवली आहे.
शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आले असताना, त्यांनीच याबाबत माहिती दिली. पदवीधर व्हायची अशी मनाशी खुणगाठ बांधली होती. सा जसा वेळ मिळाला तशा परीक्षा दिल्या आणि आज बीए पास झालो, असे ते म्हणाले.
गेली तीन वर्षे नियमित परीक्षा देऊन आता बीए पदवीधर झालो, याचे समाधान आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.