ठाणे : राज्यातील महामारीच्या दुसऱ्या लाटेवर राज्य सरकारने नियंत्रण आणले आहे. याचाच परिणाम म्हणून १० जिल्ह्यांतील निर्बंध स्तर ३ वर ठेवण्याचे आदेश दिले गेले, तर इतर सर्व जिल्ह्यांत नवीन नियमावली जारी करत मोठ्या प्रमाणावर सूट देण्यात आली. दरम्यान, ही लाट आटोक्यात आणण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अनेक कंत्राटी डॉक्टर, नर्स, कर्मचारी, वार्डबॉय यांच्यावर मात्र राज्य सरकारकडून सातत्याने संक्रांत आणली जात आहे. अशीच एक घटना ठाण्यात घडली आहे.
भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेने राज्याला ‘हा’ धोका! संजय राऊत यांनी दिला इशारा
ठाणे महापालिकेच्या बाळकुंम येथील कोविड रुग्णालयातून तब्ब्ल ५०० पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले असून, अचानकपणे कामावरून कमी केल्याचा रोष म्हणून आणि रुग्णालयाच्या मोगलाई आणि मनमानी कारभाराचा निषेध म्हणून, या सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तसेच, त्यांच्या लढ्याला राजकीय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पाठिंबा दिला आहे.
संभाजी ब्रिगेड आणि मनसे वाद चिघळला, नेत्याने दिले थेट राज ठाकरेंना खुले आव्हान
“कामगारांना न्याय दिला नाही तर रुग्णालय चालू देणार नाही. रुग्णालयाची ही मोगलाई खपवून घेणार नाही,” असा इशारा त्यांनी रुग्णालयाला दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात याआधी देखील अश्या प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर त्या त्या ठिकाणी कामगारांनी आंदोलन केल्यांनतर त्यांना पुन्हा कामावर ठेवण्यात आले होते.
टेंडर ऑफलाईन अन् पालिकेची सभा ऑनलाईन का? काँग्रेस नेते आबा बागुलांचा भाजपला रोखठोक सवाल
त्यामुळे, सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात आणि ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून, दुसऱ्याच्या जीव वाचावा म्हणून योगदान दिलं. त्या सर्व प्रकारच्या कंत्राटी डॉक्टर, नर्स, कर्मचारी, वार्डबॉय यांचा राज्य सरकारला सातत्याने विसर का पडतो आहे? त्यांच्या योगदानाचे राज्य सरकारला काहीच नाही काय? तसेच अशा मनमानी कारभार करणाऱ्या रुग्णालयाच्यामागे कुणाचा आशीर्वाद आहे? स्थानिक नगरसेवक, तसेच महापौर काय करत आहेत? हे सवाल यानिमित्ताने पुन्हा उपस्थित होतात.
Read Also :
- देवेंद्रजी, तुमची सात भेटली तर बैलगाडा शर्यत लवकर चालू करु – खासदार डॉ. अमोल कोल्हे
- आठवा महिना लागला तरी स्वतःचा पाय स्वतःच्याच धोतरात – शिवसेना
- शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात; १५ कोटींच्या संपत्तीवर आयकर विभागाची टाच
- “आपला अनुभव किती, राजकीय कारकीर्द काय?, रुपालीताई तुमची राजकीय शूर्पणखा होऊ देऊ नका!”
- “चंद्रकांतदादा, जेवढं तुमचं वय, तेवढी पवारांची संसदीय कारकीर्द”, रुपाली चाकणकरांचा जोरदार वार