IMPIMP

“त्यामुळेच भाजपच्या हातातून सत्ता काढून घेणं महत्वाचं”, शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल

Sharad Pawar

नागपूर :  गेल्या सहा महिन्यांमध्ये नागपूर आणि आजूबाजूच्या भागातून ६३० महिला आणि मुली गायब झाल्या, त्यांचा पत्ता लागत नाही. आज स्त्रियांच्या रक्षणाच्या संबंधीची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे.  त्याची पूर्तता आज या राज्यकर्त्यांकडून होत नाही. म्हणून जे राज्यकर्ते शेतकऱ्यांकडे बघू शकत नाहीत, कष्टकऱ्यांच्या हिताची जपणूक करत नाहीत, स्त्रियांना संरक्षण देऊ शकत नाहीत, तरुणांमध्ये इतकी बेरोजगारी वाढत आहे.  त्यांच्या हाताला काम देऊ शकत नाही.  अशांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही.  हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल आणि तो घ्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये या नागपूरमधल्या महाविकास आघाडीच्या सहा उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करणं आणि भाजपाच्या हातातून सत्ता काढून घेणं आणि योग्य लोकांच्या हातामध्ये सत्ता देणं हे महत्त्वाचं काम तुम्हा सगळ्यांना करायचं आहे. असे आवाहन शरद पवारांनी मतदारांना केले. नागपुर येथे सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा…बंडखोर उमेदवारांवर कॉंग्रेसकडून कारवाईचा बडगा, पुण्यातील दोन नेत्यांवर केली कारवाई 

पुढे बोलतांना ते म्हणाले की, अलीकडच्या काळामध्ये राजकारण बदललं गेलं. महाराष्ट्रामध्ये कधी नाही. ते भारतीय जनता पार्टी यांच्या विचारांचं शासन तुम्हाला आम्हाला बघायला मिळालं. सबंध राज्याची सत्ता हातात होती, पाच वर्ष ही सत्ता होती. देशाची सत्ता त्यांच्या हातामध्ये होती.  पण पाच वर्षांच्या सत्तेनंतर जी काही निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या ताकदीवर राज्याची सत्ता टिकवण्याची संधी आली असताना त्याच्यात यश आलं नाही. आज एक वेगळे सरकार आपण या ठिकाणी पाहतो.

हेही वाचा…प्रशांत जगताप अन् चेतन तुपेंच्या लढाईत ‘मनसे’ कुणाला धक्का देणार ? हडपसरमध्ये तिरंगी लढत 

आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी प्रश्नांची सोडवणूक केली नाही. शेतामध्ये कष्ट करणारा कास्तकार आज संकटामध्ये आहे. कास्तकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये विदर्भातला नंबर हा मोठा आहे. जो कास्तकार घाम गाळतो, खून-पसीना देतो, आपल्या शेतीमध्ये धान्य तयार करतो आणि देशाची अन्नाची गरज भागवतो त्या कष्टकऱ्याला या विभागामध्ये आत्महत्याच्या रस्त्याला जाण्याची वेळ आली. त्याचे महत्त्वाचे कारण त्याच्या घामाची किंमत, त्याच्या कष्टाची किंमत देण्याची जबाबदारी ज्या सरकारवर होती त्यांनी त्या प्रश्नांकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही. त्याच्यामुळेच हळूहळू संकटात गेलेला कष्टकरी शेवटी आत्महत्याच्या रस्त्यावर जातो. असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

दरम्यान, एकेकाळचं हे मध्य भारत राज्य होतं, नंतर विशाल महाराष्ट्र झालं द्विभाषिक आणि १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. कै. यशवंतराव चव्हाण  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. नंतरच्या काळामध्ये या महाराष्ट्राला नेतृत्व देण्यासाठी विदर्भातील तीन ज्येष्ठ नेते ज्यांचे स्मरण हे करणं मी माझी जबाबदारी समजतो. मारोतराव कन्नमवार, ११ वर्ष मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक या विदर्भपुत्रांनी महाराष्ट्राची सेवा केली व महाराष्ट्राला शक्ती देण्याचं काम केलं. अशीही आठवण त्यांनी केली.

READ ALSO :

हेही वाचा..“खंजीर शेजारी बसून खुपसलाय”, मनसेची मोठी फौज ठाकरे गटात दाखल 

हेही वाचा…वडगावशेरीत ‘सुनील टिंगरे’ रेडझोनमध्ये..? बापू पठारेंचं तगडं आव्हान 

हेही वाचा…“फडणवीस चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात”, मतदारसंघात कॉंग्रेसचे दुखणे काय ? 

हेही वाचा…माजी आमदाराला लोकं कंटाळलीत, पुरंदरमध्ये संभाजी झेंडे प्रचारात सक्रीय

हेही वाचा…पतीसाठी पत्नी पुतण्याच्या विरोधात प्रचाराला मैदानात उतरली.. कोण मारणार बाजी? 

 

Total
0
Shares
Previous Article
mns

"खंजीर शेजारी बसून खुपसलाय", मनसेची मोठी फौज ठाकरे गटात दाखल

Next Article
_Eknath Shinde on rahul gandhi

"१५०० रूपये द्यायला पैसे नाहीत, तर तीन हजार कुठून देणार ?" शिंदेंचा राहुल गांधींना सवाल

Related Posts
Total
0
Share