नाशिक : कुणाला अटक झाली तर प्रतिक्रिया द्यायला मी नाशिकमध्येच आहे, असं विधान करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळ उडवून दिली होती. आता चंद्रकांतदादांनी आणखी मोठं विधान केलं आहे. शिवसेना नेते अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांची चौकशी सुरू आहे, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परंतू, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यात किती दम आहे. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चिट? गृहमंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
रात्रीतून कुणाला अटक झाली तर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी मी नाशिकमध्ये उपलब्ध आहे, असं म्हटलं होतं. मी कुणाचेही नाव घेतलं नव्हतं. खूप जणांच्या चौकश्या सुरू आहेत. त्यातील अनेकांची अटक होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. परंतू, माझा नेमका रोख कुणाकडे नव्हता. तुम्हाला सोप जावं म्हणून नावांची यादी देत आहे. कुणालाही उघडं पाडायचं नाही, असे सांगत चंद्रकांत पाटलींनी जाग्यावर पटली मारली.
“प्रविण तू तर चॅम्पियन आहेसच तुझे आई-वडिलही चॅम्पियन आहेत”, नरेंद्र मोदींकडून कौतुक
पुढे बोलतांना ते म्हणाले, अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्यासाठी काल कोणी तरी कोर्टात गेलंय. नितीन राऊत यांनाही कोर्टाने फटाकरलं आहे. संजय राठोड यांचाही एक मॅटर पेंडिग आहे. अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचीही चौकशी सुरू आहे. केवळ तुम्हाला सोपं पडावं म्हणून आताच नावं घेतली आहेत, असंही पाटील म्हणाले. त्यामुळे चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यात खरंच दम आहे का?, की सत्तेसाठी केवळ भाकित करायचे असे प्रश्न उपस्थित होते आहे.
स्वबळावर लढण्याबाबतीत काँग्रेसमध्ये दोन गट? वडेट्टीवारांनी स्पष्ट केली आपली भूमिका
ठाकरे सरकारचा ‘करेक्ट कार्यक्रम’ कधी?
काही दिवसांपुर्वीच पंढरपूर – मंगळवेधा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक झाली. दरम्यान काळात भाजप नेत्यांनी प्रचार सभेत बोलताना, ‘भाजपचा उमेदवार निवडणून द्या, आम्ही या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो’, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर जनतेचे निवडणूकीचा कौल भाजपला दिला. उमेदवार विजयी झाला. निवडणूकीची रणधुमाळी संपून तीन महिने उलटले देखिल मात्र अद्याप त्या अनुशंगाने कोणतीही हालचाल दिसून आली नाही. केवळ भाकीतावर भाकीत करणे चालू असल्याचे चित्र आहे.
अधिवेशनात भाजपचा करेक्ट कार्यक्रम
६ आणि ७ जुलै रोजी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन झाले. यावेळी सरकारला धारेवर धरण्याच्या अनुशंगाने पावले टाकणारे भाजपचे पदाधिकारीच ठाकरे सरकारच्या गळाला लागले. अधिवेशनात मोठा गदारोळ झाल्यामुळे तब्बल भाजपचे १२ आमदार निलंबित झाले. त्यामुळे करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी उलावळ झालेला भाजप बॅकफुटला येवून बसला.
फडणवीस-पंकजा मुंडे यांच्या राजकीय संबंधांवर, रामदास आठवलेंचा धक्कादायक खुलासा!
पाटलांच्या वक्तव्यात किती दम
ठाकरे सरकारचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी उतावळा झालेल्या भाजपचाच करेक्ट कार्यक्रम झाला. त्यामुळे, जवळ आलेला सत्तेत येण्याचा मार्ग कोसो दुर झाला. आणि त्यानतंर भाजपात जे घडले ते पाहाणे औत्युक्याचे ठरले. कारण १२ आमदारांच्या निलंबणानंतर भाजपने सरळ वक्तव्यच बदलले. ठाकरे सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणाणारे भाजप नेते हे सरकार स्वतच्या वजनानेच कोसळेल, अशा वक्तव्यांवर येवून थांबले आहे. त्यातच आता चंद्रकांत पाटलांनी मोठे भाकित केले आहे. त्यामुळे पाटलांच्या वक्तव्यात किती दम आहे, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- नाना पटोलेंच्या बोलण्याने आम्हाला काही फरक पडत नाही; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे रोखठोक विधान
- राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; मनसे आणि भाजपा एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण
- राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; मनसे आणि भाजपा एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण
- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चिट? गृहमंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान
- स्वबळावर लढण्याबाबतीत काँग्रेसमध्ये दोन गट? वडेट्टीवारांनी स्पष्ट केली आपली भूमिका