नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठा घोळ झाला आहे. या निवडणुकांचा अभ्यास केला असता यातमध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडले आहेत. पाच महिन्यातच मोठ्या संख्येने मतदार कसे वाढले ? असा सवाल करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी अनेक खुलासे केले आहेत. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…ठाकरे गटातील कोणते ६ खासदार शिंदे गटात जाणार ? उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा धर्मसंकट ?
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोगानं यापूर्वीच मतदार वाढीबाबत वारंवार स्पष्ट उत्तरं दिली आहेत, तरीही दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाहीची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“महायुतीच्या नीट बातम्या द्या, नाहीतर…” हाती AK 47 बंदूक हाती घेत अजितदादांचा इशारा
उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यात होणारा पराभव आधीच दिसत असल्यामुळे राहुल गांधी यांची रडारड आतापासूनच सुरू झाली आहे. जनतेनं काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना सातत्यानं नाकारलं आहे, हे वास्तव स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही. आता पराभव लपवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणं, हा निराशेचा कळस आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.
खरं तर या पत्रकार परिषदेत शेजारी बसलेल्या सुप्रियाताई सुळे यांनी ‘मी याच ईव्हीएमवर विजयी झाले‘ असं सांगितलं होतं. पण राहुल गांधी यांना नौटंकी करायची असल्यानं ते सत्य स्वीकारणार नाहीत. राहुलजी लोकशाहीवर विश्वास ठेवा, निराधार आरोप करून लोकशाहीची विटंबना करू नका. या देशातील जनतेला आपला खोटारडेपणा आता पुरता कळून चुकला आहे. असेही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…कृषी विभागातील सर्वात मोठा घोटाळा..! धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढल्या
हेही वाचा…“तोच विनोद पुन्हा-पुन्हा..”, राहुल गांधींच्या दाव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…भाजपने चिटींग करून महाराष्ट्रात निवडणूक जिंकली..! राहुल गांधींनी थेट पुरावाच दिला
हेही वाचा…ठाकरे गटाच्या खासदारांची वज्रमुठ, पत्रकार परिषद घेत जाहिर केली भूमिका
हेही वाचा…९० दिवसात टप्प्या टप्प्याने प्रवेश होणार..! उदय सामंतांनी सांगितली आतली बातमी