जळगाव : सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली होती, असा दावा रोहित यांनी केला आहे. ते आज जळगावात बोलत होते.
संजय राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नसेल; चित्रा वाघ भडकल्या
मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागला आहे. शिवसेना तसेच राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळ्या तपास संस्थांच्या कचाट्यात सापडले आहेत. याच कारणामुळे ईडी, सीबीय तसेच आयकर विभाग भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
कोरोना लसीचे १०० कोटी डोस खरोखरच दिले गेलेत का? संजय राऊतांचा सवाल
आमदार रोहित पवार हे शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात दुपारी दीड वाजता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. “साधारण सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. या बैठरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली. तसे पत्रही भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर मंत्र्यांवर ईडी व सीबीआयच्या कारवायांचे सत्र सुरू आहे,” असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला. तसेच केंद्र सरकारकडून राज्य सरकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला.
Read Also :
- शेतकऱ्यांच्या हिताच्या आड जो येईल त्याला तुडवणार; राजू शेट्टींचा इशारा
- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना धमकीचा फोन; जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ
- मुंबई पोलिसांनी २७ कोटींचे हेरॉईन पकडले, पण त्यात हेरॉईनच नव्हती म्हणून प्रसिद्धी मिळाली नाही
- मुंबईतील इमारतीच्या आगीत एकाचा मृत्यू; महापौर किशोरी पेंडणेकर म्हणतात, सिक्युरिटीवर कारवाई करू…
- माजी आमदार विलास लांडेंचा समंजसपणा; आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित गव्हाणेंचे गुडघ्याला बाशिंग