कर्नाटक – भाजपाला पाठिंबा न देता तसेच भाजपामध्ये प्रवेश न केल्यामुळे मला तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले, असा दावा कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजपा सरकारला देशातील सर्वांत भ्रष्ट सरकार असल्याचे म्हटले आहे.
चैत्यभूमीबाहेर ऑल इंडिया पँथरच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ; पोलिसांची तात्काळ कारवाई
भाजपाने मला तुरुंगात पाठवले, कारण मी त्यांना पाठिंबा दिला नाही आणि त्यांच्यासोबत गेलो नाही, असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले. मात्र, शिवकुमार तुरुंगात का गेले, असा सवाल भाजपाकडून उपस्थित करण्यात आला. भाजपात प्रवेश केल्यानंतर तुरुंगात गेले नसते का? असा प्रश्न विचारले असता यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “याबाबत सगळ्यांना सर्व माहीत आहे. तसेच त्याचे रेकॉर्डसुद्धा आहे.”
कर्जतमध्ये महाविकास आघाडीत संभ्रम; जागा वाटपाचा तिढा काही सुटेना.
राज्य कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने आकारलेल्या किकबॅक शुल्काची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत कर्नाटकातील सध्याचे भाजपा सरकार देशातील सर्वांत भ्रष्ट सरकार असल्याचे शिवकुमार म्हणाले. दरम्यान, शिवकुमार यांना ईडीने ३ सप्टेंबर २०१९ रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले. त्यानंतर महिनाभरात दिल्ली हाय कोर्टाने जामीन मंजूर करून त्यांची सुटका करण्यात आली.
Read Also :
- दिलीप वळसे पाटलांची बाजी, पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध
- पवार कुटुंब ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
- अकोले नगरपंचातीमध्ये भाजपचीच सत्ता; वैभव पिचड यांचा दावा
- अध्यक्षपद हुकल्यानंतर शिवेंद्रराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- ठाकरे सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले; भाजप नेते गिरीष महाजनांचा गंभीर आरोप