माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर सर्व स्तरांवरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे . राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन खास फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळाही दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांच्यासोबत गप्पा मारतानाचा एक फोटो शेअर केला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा असं ठाकरेंनी या फोटोसह कॅप्शन दिलंय. विशेष म्हणजे हा फोटोही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाचाच असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ईश्वर आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना🙏🏼 pic.twitter.com/bmxOphnXea
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 22, 2020