मुंबई : दरम्यान, विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन ८ महिन्यापासून सुरु असलेलं राजकारण आणि त्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री (महाविकास आघाडी सरकार) यांच्यात चालू झालेला संघर्ष कदाचित आज थांबण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि निर्णयाप्रत येण्यासाठी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मविआच्या नेत्यांना भेटीची वेळ दिली असून, त्यानुसार मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला आले आहेत.
राणे-सेना वादानंतर राऊतांच्या सुरक्षेत वाढ, घर आणि कार्यालयाला छावणीचं स्वरूप!
त्यामुळे, बहुप्रतिक्षित असलेल्या या भेटीतून नेमका कोणता मार्ग निघतो?काय तोडगा निघतो? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांशी आज १२ आमदारांच्या जटिल विषयावर चर्चा केली. आता मिळालेल्या माहितीनुसार त्या १२ जणांच्या यादीमधील काही नावांबाबत राज्यपालांचे आक्षेप आहेत, असे समजते आहे.
“…तर देशात लसीकरण शक्य नसतं आणि देश कायमच्या लॉकडाऊनमध्ये गेला असता” – फडणवीस
त्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कोट्यातून शिफारस करण्यात आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे माजी खासदार यांच्यावर विविध आंदोलनात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या दोघांच्याही नावाला कशी काय मान्यता द्यावी, असा सवाल आहे. त्यामुळे या नावावर फेरविचार करण्याची सूचना राज्यपाल देऊ शकतात, असे सांगण्यात आले. त्यामुळे राज्यपालांच्या कोणत्या सूचना ठाकरे सरकार मान्य करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी? दिलीप मोहिते-पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर
सरकारकडून पाठवलेल्या १२ जणांच्या यादीत, राष्ट्रवादीचे ४, काँग्रेसचे ४, तर शिवसेनेच्या ४ सदस्यांच्या समावेश आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे – समाजसेवा आणि सहकार, राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा, यशपाल भिंगे – साहित्य, आनंद शिंदे – कला तर काँग्रेसकडून रजनी पाटील – समाजसेवा आणि सहकार, सचिन सावंत – समाजसेवा आणि सहकार, मुझफ्फर हुसेन – समाजसेवा, अनिरुद्ध वनकर – कला यांची नावे पाठविण्यात आली आहेत, तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर – कला, नितीन बानगुडे पाटील – शिवव्याख्याते, विजय करंजकर – शिवसेना नाशिक जिल्हाध्यक्ष आणि चंद्रकांत रघुवंशी – नंदुरबार (पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार) यांच्या नावाचा समावेश आहे.
त्यामुळे या नावांच्या बदल्यात दुसरी नावं देता येतील का? आणि ती देऊन १२ जणांच्या नावाची नवीन यादी काही दिवसांत जाहीर होईल, अशी चर्चा सध्या सुरु आहे. यावर महाविकास आघाडीत चर्चा आहे. मात्र दुसरीकडे दिलेल्या यादीवर महाविकास आघाडी ठाम राहिल का? असे झाले तर हा मुद्दा तसाच राहून अजून चिघळू शकतो. त्यामुळे, विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबतची कोंडी फुटेल का? असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जात आहे.
आक्षेप असणारी इतर काही नावे?
सचिन सावंत, काँग्रेस
यशपाल भिंगे, राष्ट्रवादी काँग्रेस
नितीन बानगुडे पाटील, शिवसेना
Read Also :
- “…आता तसं कुणी म्हटलं कि दुसरा चेहरा नजरेसमोर येतो,” चंद्रकांत पाटलांचं युतीबद्दल मोठं भाष्य
- मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट; शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारही
- आगामी निवडणुकीत युती की महाविकास आघाडी? शरद पवारांनी आढावा बैठकीत केले चित्र स्पष्ट
- “राष्ट्रपतींनी राज्यपालांची चौकशी करावी, त्यांच्यामुळे राष्ट्राला व संविधानाला धोका”- बच्चू कडू
- भुजबळांच्या ‘त्या’ इमारतीचे खरे मालक सांगा! मुख्यमंत्री आणि शरद पवारांना सोमैय्यांचे चॅलेंज