बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराडला बीड कोर्टाने पुन्हा एकदा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुरूवातीला खंडणी प्रकरणी त्याला ७ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा कोर्टात हजर केले होते. देशमुख हत्याप्रकरणातील आतापर्यंत अटक केलेले सर्व आरोपी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पुन्हा एकदा प्रकरणाला गती प्राप्त झाली आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाचे ४ आमदार अन् ३ खासदार फुटणार, बड्या नेत्याचा बडा दावा
खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर या प्रकरणात सुदर्शन घुले, विष्णू चाटे याच्यासह अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व आरोपी काल एकाच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेत. यावरून विरोधकांनी देखील यावरून सरकारला धारेवर धरले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील यावरून संशय व्यक्त केला आहे.
हेही वाचा…उत्साहपूर्ण वातावरणात अजिंठा – वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप संपन्न
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत काही मुद्दे समोर आले आहेत. वाल्मिक कराड, विष्णु चाटे आणि इतर आरोपींसोबत पोलीस सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहेत. अक्षय शिंदे केसच्या न्यायालयीन चौकशीत पोलिसांवर गंभीर संशय घेण्यात आला. पोलीस राजकीय हस्तक झालेत का..? पोलिसांची कॉलर शरमेने खाली जाणाऱ्या घटना घडत असताना देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून जबाबदारी घेणार आहेत की नाही..? असा सवाल देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.
हेही वाचा…बालेवाडीत होणार “भव्य अटलसेवा महाआरोग्य शिबीर”, मंत्री, आमदार, खासदार देखील राहणार उपस्थित
हेही वाचा…पालकमंत्र्यांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यांनंतरच सुटणार का ?
हेही वाचा…मोठी बातमी…! वाल्मिक कराडला पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
हेही वाचा…दावोसमध्ये महाराष्ट्राची विक्रमी गुंतवणूक..! इतक्या कोटींची झाली गुंतवणूक