मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्यवर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या गंभीर आरोपानंतर, त्यांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी केली जात आहे. यातच काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने समन्स रद्द करण्याच्या देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्यांनतर, आता उच्च न्यायालयानेही यावर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. तसेच, देशमुखांच्या वकिलाला सीबीआयने ताब्यात घेतले असून, त्यांना ७ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
अनिल देशमुख प्रकरणात नवी माहिती समोर, आयफोनसाठी केला चौकशी अहवाल लीक
यातच आता अजून एक मोठी घडामोड यासंदर्भात घडून येत असून, देशमुख यांच्याभोवतीचा फास तपास यंत्रणांनी आणखीन आवळला आहे. ईडीने त्यांना याआधी चौकशीसाठी पाच वेळा समन्स बजावले होते. मात्र, ते गैरहजर राहिल्यानंतर आता त्यांचा ठावठिकाणाही लागत नसल्याने, ईडीने त्यांना शोधण्यासाठी थेट सीबीआयची मदत मागितली आहे. यामुळे आता ईडी आणि सीबीआय दोन्ही तपास यंत्रणा राज्यभरात ठिकठिकाणी देशमुखांना शोधण्यासाठी छापेमारी करण्याची शक्यता आहे
समन्सनंतर आता ईडीकडून देशमुखांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी
दुसरीकडे, सीबीआयने वकील डागा आणि नंतर सीबीआय अधिकारी अभिषेक तिवारीला, देशमुख यांना क्लीनचिट दिल्याचा प्राथमिक चौकशी अहवाल लीक झाल्याच्या संदर्भात अटक करून ७ दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर, अभिषेक तिवारीने आयफोनसाठी 12 प्रो साठी हा चौकशी अहवाल लीक केला असल्याचे उघड झाले आहे. २८ जूनला तिवारी, देशमुख प्रकरणाच्या तपासासाठी पुण्याला गेला होता. त्यावेळी, त्यांची डागा यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी हा अहवाल लीक करण्यासाठी त्यांना लाच दिली होती.
Read Also :
- मुश्रीफ ठोकणार सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा, पाटील-घाटगेंनाही दिला इशारा
- १०० कोटीचा दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का? – चंद्रकात पाटील
- मोठी बातमी: हसन मुश्रीफांनी केला १२७ कोटींचा भ्रष्टाचार, किरीट सोमय्यांचा पुराव्यानिशी आरोप
- ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुका ओबीसी विरुद्ध ओबीसीच होणार!’ वडेट्टीवारांचं विधान
- ‘बाळासाहेब थोरातांची भूमिका योग्यच, राष्ट्रवादीने काँगेसमध्ये विलीन व्हावं!’