देहू : तीर्थक्षेत्र देहूगाव नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. राष्ट्रवादीचे 14, अपक्ष 2 आणि भाजपचे 1 उमेदवार विजयी झाले आहेत. पहिल्या नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली. शिवसेना, काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
पंतप्रधानांची अशी खिल्ली उडवणे चुकीचे; आमदार रोहित पवारांनी केली मोदींची पाठराखण
ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यानंतर देहूगाव नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक झाली. दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. त्याची मतमोजणी आज पार पडली. राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती.
शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती, नाना पटोले तुमचे हात सांभाळा; अनिल बोंडेंचा इशारा
मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची जादू चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 उमेदवार विजयी झाले. तर, दोन अपक्षांनीही बाजी मारली. भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे. राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन मातब्बर उमेदवाराचा पराभव झाला.
Read also:
- केंद्रिय मंत्री भारती पवारांच्या मतदारसंघात शिवसेनेचा बाण; भाजपला ‘जोर का’ झटका
- भाजपच्या राम शिंदेंना रोहित पवारांचा धक्का; कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
- नाना पुणे भाजपा स्वागतासाठी उत्सुक; पटोलेंच्या विरोधात पुण्यात जोरदार बॅनरबाजी
- पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे नाना पटोले यांना जोडे मारा आंदोलन; आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध
- जो न्याय नारायण राणेंना, तो नाना पटोलेंना का नाही?