पुणे – राज्याच्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्यांवरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने विधानसभा अध्यक्ष पदासाठी नियम बदलले आहेत. सरकारला जरी भीती असली तरी नियम बदलून चालत नाही. बहुमताच्या जोरदार या सरकारने महाराष्ट्राचे वाटोळं केले आहे. उद्धव ठाकरे यांना केवळ मुख्यमंत्री पदाची खुर्ची प्रिय आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षाही भयानक झाले आहे. त्यांच्या कामगिरीसाठी आता नवीन प्राणी शोधावा लागेल, असा घाणाघात करत एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर मांडलेल्या परखडपणाबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
शिवसेनेची अवस्था ‘म्याव म्याव’ सारखी झाली आहे; आमदार नितेश राणेंचा घणाघात
आज चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अजित पवारांनी एसटीचे विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विलीनीकरण का होणार नाही, हे त्यांनी सांगावे? अजित पवार दादागिरीने एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. परखड मतांने सर्वच कामे होत नाहीत, असा टोलाही पाटील यांनी पवारांना लगावला आहे.
राज्यात पुन्हा एकदा लागणार ‘निर्बंध’; रात्रीची जमावबंदी, नवीन नियमावली होणार आज जाहीर
दुसरीकडे परीक्षेत भष्ट्राचार झाला असून याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. म्हाडा, आरोग्य, टीईटी परीक्षेत मोठा भष्ट्राचार झाला आहे. सगळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले आहेत. टीईटी परिक्षा रद्द करावी. टीईटी परीक्षा पुन्हा नव्याने घ्यावी. या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीनंतर यातील अनेक मंत्री पुढे येतील. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सीबीआय चौकशीला घाबरत आहे. या घोटाळ्यात आमचा कार्यकर्ता दोषी असेल तर त्याला फाशी झालीच पाहिजे, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
Read also:
- ही प्रजाती फक्त भंगारात आढळते; डुकराचा फोटो शेअर करत नितेश राणेंनी केली ‘या’ मंत्र्यावर टीका
- २१६ जिवंत व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश; शासनाचा गलथान कारभार की ५० हजारांची लालसा?
- राणेंच्या म्याव म्यावचे विधानसभेत पडसाद; फडणवीस, पवार, मुनगंटीवारांनी टोचले राणेंचे कान
- पवार घराण्यावर विश्वास ठेऊ नका हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो; एसटी कामगारांवरून पडळकर बरसले
- महाराष्ट्रातील निवडणुकांवर ओमिक्रॉनचे सावट; विधासभेत चर्चा निवडणूका पुढं ढकलणार ?