बुलढाणा : माझ्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल केले त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असा दम भाजप आमदार संजय कुटे यांनी महाविकास आघाडी सरकारला भरला आहे.
अखेर समीर वानखेडे यांचा करेक्ट कार्यक्रम; लवकरच बदली होणार?
जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्य़ांच्या विविध मागण्यासाठी आज भाजपा किसान आघाडी तर्फे मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी भाजपा आमदार संजय कुटे यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांना इशारा दिला आहे.
अखेर समीर वानखेडे यांचा करेक्ट कार्यक्रम; लवकरच बदली होणार?
आमदार संजय कुटे म्हणाले की, तीनच काय दहा पक्ष जरी एकत्र आले तर मी घाबरणारा नाही, तुम्ही फक्त औकातीत रहा, पाठीमागून वार काय करता समोरून वार करा, खोट्या एट्रोसिटी किंवा महिलेच्या केसेस मध्ये माझ्या कार्यकर्त्यांना काय अडकवताय अवकातीत रहा नाहीतर गाठ माझ्याशी आहे. असा दमच यावेळी शेतकऱयांसमोर संजय कुटे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना व कार्यकर्त्यांना दिला आहे.
Read Also :
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक; सायबर सेलकडे तक्रार
- देवाकडून बंद होणारा ऑक्सिजन पुरवठा मीच सुरू केला, असंही उदयनराजे म्हणतील – शिवेंद्रराजेंचा घणाघात
- शिवसेनेत उडाली खळबळ; नाराज पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे, राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
- जनाब संजय राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय – चित्रा वाघ
- समीर वानखेडे यांच्या कुटूंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या; जीवाला धोका असल्याचा पत्नीचा दावा