अहमदनगर : २०१९च्या विधानसभा निवडणुकीपासून राज्यात महाविकास आघाडी पॅटर्न सुरु झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस असं तीन पक्षाचं मिळून सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढायचं असं तीनही पक्षांनी ठरवलं आहे. असं असलं तरी देखील काही ठिकाणी बंडखोरीचा फटका बसतोच.
‘देशमुखांच्या सांगण्यावरून पोलीस खात्यात रुजू झालो’; सचिन वाझेंचा खळबळजनक जबाब
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, शिर्डी, कर्जत व अकोले या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम काल राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. या निवडणूक कार्यक्रमानुसार २१डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय हलचालींना वेग आला आहे. या पारनेरमध्ये हाय होल्टेज लढती बघायला मिळणार आहेत. यामध्ये दोन नेत्यांमध्ये चांगलाच संघर्ष बघायला मिळणार आहे. एक म्हणजे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, माजी आमदार विजयराव औटी आणि दुसरीकडे आमदार निलेश लंके. दोन्ही नेते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असले तरी पारनेरमध्ये मात्र महाविकास आघाडी पॅटर्न चालणार नाही हे मात्र १०० टक्के खरं आहे.
स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला झटका; राष्ट्रवादीने उचललं मोठं पाऊल..
खासदार डॉ. सुजय विखे पाटील गट कोणाला साथ देणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. पारनेर नगरपंचायत स्थापन झाल्यापासूनची ही दुसरीच निवडणूक आहे. पहिली निवडणूक २०१५ साली झाली होती आणि त्या वेळी एकही पक्षाला बहुमत न मिळाल्याने अपक्षांच्या मदतीने शिवसेनेचे तत्कालीन आमदार विजय औटी यांनी सत्ता स्थापन केली होती. शिवसेनेच्या सीमा औटी या प्रथम अडीच वर्षे सभापती झाल्या होत्या. त्या नंतर त्यांची मुदत संपल्यावर पुढील अडीच वर्षासाठी सभापती निवड होताना मोठ्या नाट्यमय घटना घडल्या. त्या वेळी अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसनेचे काही नगरसेवक फोडून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या वर्षा नगरे यांनी बाजी मारत नगराध्यक्ष पद मिळविले होते.
‘तुटेपर्यंत ताणू नका, एकदा तुटलं तर जोडणार नाही’; अनिल परब यांचा इशारा
या निवडणुकीत माजी आमदार औटी यांना आपले तालुक्यातील अस्तित्व राखण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. औटी हे पारनेर शहरात राहतात शिवाय ते माजी आमदार आहेत. नगरपंचायत स्थापन होण्यापूर्वी सुमारे १५ वर्षे त्यांचीच ग्रामपंचायतीतही सत्ता होती. नगरपंचायतीतही सुरवातीस व शेवटीही त्याचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. नीलेश लंके आमदार झाल्या नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. शिवाय पारनेर शहर म्हणजे तालुक्याचे गाव आहे. विद्यमान आमदार असल्याने त्यांना ही निवडणूक जिंकावी लागणार आहे.
Read Also :
- राज्यात ठाकरे, पवार यांनी एकत्र यावं ही तर बाळासाहेबांची इच्छा; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
- ठरलं तर…! विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय
- ‘भाजपचे नेते एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून भडकवत आहेत’, मलिकांचा आरोप
- प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय? संजय राऊतांचा सदावर्तेंना रोखठोक सवाल
- आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; हिंगोलीतील शेतकऱ्यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी