मुंबई : ‘कोरोनाच्या संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून, दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत, इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता. आपल्याला तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या’, असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
“मलाही तुमच्यातला दम पाहायचंय,” चित्रा वाघ यांनी स्वीकारलं मेहबूब शेख यांचं आव्हान
दरम्यान, राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला त्वरित प्रतिसाद दिला असून, गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेणार नसल्याचे राष्ट्रवादीकडून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले आहे. पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. “गर्दी होईल असे कार्यक्रम घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनाई करण्यात आली असून, असे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून होणार नाहीत, अशीच पक्षाची भूमिका आहे,” असे त्यांनी सांगितले.
“…अन्यथा संजय राऊतांना पुण्यात फिरुही देणार नाही,” भाजपचा आक्रमक पवित्रा
दुसरीकडे, महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल देशाच्या टास्क फोर्सने इशारा दिल्यांनतर, राज्याच्याही टास्क फोर्सने पावले उचलायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काल, तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत राज्याच्या कृतीदलाने आयोजित केलेल्या “माझा डॉक्टर” या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आंदोलन, तसेच यात्रेवरून राजकीय पक्षांना फटकारले.
“राजकारण आपलं पण जीव जातो जनतेचा”, मुख्यमंत्र्यांनी मनसे-भाजपला सुनावले
“मला आश्चर्य वाटतं. आपण सगळी काळजी घेत असताना, अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. हे उघडा, ते उघडा, अमूक उघडा, तमूक उघडा, असं ते म्हणत आहेत. जरा धीर धरा, राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो,” असं म्हणत राजकीय पक्षांना फटकारले, तर “आपण गोष्टी उघडत आहोत, तेव्हा त्या बंद करण्याची वेळ येऊ नये, याचीही खात्री करून पुढे जात आहोत. घाई-गर्दी केली, तर आणखी काही महिने, काही वर्षे या संकटातून आपण बाहेरच पडू शकणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
Read Also :
- विधानसभा पराभूत उमेदवारांवर मोठी जबाबदारी? पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक
- महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर; सण, उत्सव नंतरही साजरे करू शकतो; मुख्यमंत्र्यांच कळवळीच आवाहन
- “एक अनिल जेलच्या दरवाजात, तर दुसरा मुहूर्त शोधतोय,” किरीट सोमय्यांचा घणाघात
- “मंग बारामतीची एक जागा गेली म्हणून समजा आणि शरदला उमेदवारी द्या” शरद पवार यांच्या पहिल्या निवडणूकिचा किस्सा
- पडळकर खऱ्या बापाची औलाद असतील तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, वडेट्टीवारांचे आव्हान