पिंपरी: पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला महापलिकेतील सत्ता पुन्हा मिळवूण देण्याचा ‘विडा’उचलेले माजी महापौर योगेश बहल यांना प्रदेश पातळीवरून मोठी जबाबदारी सोपवली आहे. आगामी पालिका निवडणुकीत योगेश बहल निवडणूक प्रभारी आणि मुख्य प्रवक्ता म्हणून काम पाहणार आहेत.
विशेष म्हणजे, बहल यांच्या निर्देशानुसार, शहर राष्ट्रवादीच्या संघटनेत मोठे बदल करण्यात आले. नगरसेवक अजित गव्हाणे यांना शहराध्यक्षपद आणि महिला शहराध्यक्षपदी कविता आल्हाट यांची निवड करण्यात आली. या निवडीमागे आणि शहरातील जातीय गणिते बसवण्यात योगेश बहल यांचा सहभाग महत्त्वपूर्ण राहिला आहे.
मिशन-२०२२ : माजी महापौर योगेश बहल हेच पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीमधील ‘बॉस’
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर योगे बहल हेच पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे ‘बॉस’राहतील, असे वृत्त ‘पॉलिटिकल महाराष्ट्र’ने दिले होते. त्यानंतर दोन दिवसांत शहरातील संघटनेत बदल झाला आणि बहल यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवडमधील ‘मॅनेजमेंट गुरू’माजी महापौर योगेश बहल हेच २०२२ च्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर ‘बॉस’आहेत, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीच्या शहर संघटनेत आता बदल केले असून, शहराध्यक्ष, महिलाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अशा तीनही पदांवर बहल यांच्या नियंत्रणाखाली निवड झाली आहे. त्यामुळे शहर राष्ट्रवादीचा ‘रिमोट कंट्रोल’पिंपरी मतदार संघातून बहलांच्या हातात राहिला आहे.
” तू योद्धा महान है ” नितेश राणेंच्या मुंबईतील बॅनरने शिवसेनेला पुन्हा डिवचले
संघटनात्मक त्रिसूत्रीचे जनक योगेश बहल…
भाजपातील नाराज नगरसेवकांचे राष्ट्रवादीत होणारे प्रवेश केवळ नव्या कार्यकारिणीच्या घोषणेच्या प्रतीक्षेत थांबवले आहेत. प्रभाग रचना करताना राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे. प्रभाग रचनेची स्थानिक धुरा योगेश बहल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या प्रभाग रचनेत गावकी-भावकीचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला. विशेष म्हणजे, स्वपक्षीय विरोधकांसह भाजपा आणि शिवसेनेतील मातब्बरांची गोची करण्यात योगेश बहल यशस्वी झाले आहेत. २०२४ मध्ये आपल्या विचारांचे आमदार शहरातील तीनही मतदार संघात असावेत आणि शहराची लीडरशीप आपल्या मुठीत ठेवण्यासाठी २०२२ मधील पायाभरणी करण्यात योगेश बहल यशस्वी होताना दिसत आहेत.
Read also:
- किरीट सोमय्यांच्या सत्काराला महापालिकेने परवानगी नाकारली; भाजप सत्कार करण्यावर ठाम
- संजय राऊत मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानावर; आशिष शेलारांची राऊतांवर बोचरी टीका
- मोठी बातमी: बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण…
- लढा एसटी विलिनीकरणाचा; अहवाल सादर करण्यास आठवडाभर मुदवाढ
- यापुढे सिंधुदुर्गात दहशत चालणार नाही; वैभव नाईकांचा राणेंना कडक शब्दात इशारा