पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सन २०११ ची लोकसंख्या गृहीत न धरता बुधवारी झालेल्या मंत्रीमडळाच्या बैठकीत पुणे शहरातील नगरसेवक संख्या १७५ अंतिम कऱण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईकरांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान १७ सदस्य व कमाल ६५ इतकी आहे. महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.
देवेंद्र फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचे अधःपतन बघवत नाही – संजय राऊत
२०११च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. कोवीड-19 च्या प्रार्दुभावामुळे २०२१ च्या जनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरुन अधिनियमात नमुद केलेल्या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत १७ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पिंपरी चिंचवडला 11 नगरसेवक वाढणार
पिंपरी चिंचवड महापालिकेत 128 चे आता 139 नगरसेवक म्हणजेच 11 जादाचे होणार आहेत. 12 लाख ते 24 लाखा दरम्यान लोकसंख्या असलेल्या महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 11 ने वाढणार आहे. 2011 च्या जनगणेनुसार पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 आहे. तर, आता अंदाजे 27 लाख इतकी शहराची लोकसंख्या आहे. त्यामुळे पिंपरी महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 11 ने वाढणार आहे. त्यामुळे 128 नगरसेवकांची संख्या आता 139 होणार आहे.
Read Also :
- देवेंद्र फडणवीस इकडे येऊन गाजर वाटप करुन गेले असतील – आदित्य ठाकरेंचा निशाणा
- जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- विलासराव देशमुख यांच्या परिवारातील साखर कारखान्यांचे घोटाळे लवकरच बाहेर काढणार – किरीट सोमय्या
- जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्यांचे दात घशात गेले; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला
- …तर एकनाथ खडसे यांना ईडी वाजत गाजत परत पाठवेल; गिरीश महाजनांचा टिमटा