पुणे : अजित पवार समर्थकांनी पुण्यात बॅनरबाजी केली असून जत्रेत खेळणाऱ्यांनी तालमीतल्या पैलवानांचा नाद करू नये असं यामध्ये म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यात अजित पवार यांच्यावर किरिट सोमय्या यांच्याकडून सातत्यानं गंभीर असे आरोप केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा बोर्ड लावला असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच समझने वालों को इशारा काफी है असंही त्यावर म्हटलं आहे.
माजी गृहमंत्री व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांचे हनीमून कुठे सुरू आहे, ते शोधा – अमृता फडणवीस
पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात अजितदादांच्या हातात तलवार असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. नगरसेवक युवराज बेलदरे यांनी हे बॅनर लावले असून त्यांनी अजित दादांचे समर्थन केलंय. या पोस्टरवर “समझने वालों को इशारा काफी है” असं लिहिलं आहे. तसंच “जत्रेत खेळणाऱ्या पैलवानांनी तालमीकडे खेळणाऱ्या पहिलवानचा नाद करू नये” असा मथळा यावर आहे.
सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर चर्चेत राहण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून बॅनरबाजी केली जात असल्याचं म्हटलं जात आहे. हे बॅनर लावण्यासाठी संबंधित नगरसेवकांनी परवानगी घेतलीय का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसंच बॅनग अनधिकृत आहे का यावर महापालिकेकडून कोणतीही माहिती मिळाली नाही.
Read Also :
- बीडमध्ये काँग्रेसला पडली मोठी खिंडार! राजकिशोर मोदींचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
- बड्या बड्या बाता आणि ‘धोरण’ खातंय लाथा, अशी विजय वडेट्टीवरांची गत झाली – गोपीचंद पडळकर
- उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदी निवड होण्याआधी ‘त्या’ रात्री काय घडलं? नारायण राणेंनी केला मोठा गोप्यस्फोट
- खडसे विरुद्ध खडसे संघर्ष टळला, खासदार रक्षा खडसे यांचा अर्ज झाला बाद
- भाजप आमदाराच्या मॉलमध्ये राष्ट्रवादीची दुकाने; खासदार अमोल कोल्हे यांच्या समोरच पक्षाचा भांडाफोड