कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठरल्याप्रमाणे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस ठाण्यात जाऊन किरीट सोमय्यांनी तक्रार दिली. हसन मुश्रीफ यांनी बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्यांचा आहे. त्याचीच तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या मुरगूड पोलिसात गेले. यावेळी किरीट सोमय्या यांची तक्रार कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील यांनी स्वीकारली.
मोठी बातमी! प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पुराच्या पाण्यात गेली वाहून
महत्त्वाचे म्हणजे पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील हे दिवंगत गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांचे सख्खे बंधू आहेत. राष्ट्रवादीचे नेते असलेले हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील तक्रार राष्ट्रवादीच्या दिवंगत नेत्याच्या पोलीस भावाकडे करण्यात आली. यावेळी पोलिस स्थानकात किरीट सोमय्या यांनी आर आर आबांच्या आठवणींना उजाळा दिला. आर आर आबा चांगले होते, सज्जन होते, सध्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यासारखे नव्हते, मला बऱ्याचदा सल्ला द्यायचे आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो, असं किरीट सोमय्या यांनी पोलीस अधीक्षक राजाराम पाटील यांना सांगितलं.
परिवहन मंत्री अनिल परब यांची आज ईडी चौकशी; स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मुलींची घातली शपथ
घोटाळेबाज मंत्री हसन मुश्रीम यांना तुरूंगात धाडणार. आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात झाली आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
Read Also :
- जयंत पाटील आले, पण एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत – पंकजा मुंडे
- मराठवाड्यात ढगफुटीपेक्षा जास्त पाऊस; शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावला
- आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात, चार महिन्यात अर्धे मंत्री रुग्णालयात दाखल होतील – सोमय्या
- कात्रजचा खून झाला…; पुण्यातील बॅनरमुळे उडाली एकच खळबळ
- नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार; चिपी विमानतळाचं उद्घाटनं मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच