मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणाची चौकशी करणारा झोटिंग समितीचा गायब झालेला अहवाल सापडला आहे. भोसरी जमीन प्रकरणातला झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाल्याचे वृत्त काल आलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. हा अहवाल नक्की कसा गायब झाला याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. पण या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले होते.
नाना पटोले काय बोलतात, कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य; सामना मधून पटोलेंचं कौतुक आणि कानपिचक्याही
झोटिंग समितीच्या अहवालात नेमकं काय?
- वैयक्तिक उद्देशासाठी सत्तेचा गैरवापर केल्यास त्याला कायदेशीर मान्यता देता येत नाही
- खडसेंनी त्यांच्या स्वत:च्या किंवा पत्नी आणि जावयाच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला
- MIDC च्या जमिनी संदर्भात माहितीचा वापर करुन, खडसेंनी गोपनियतेच्या शपथेचा भंग केला
- जमिनीच्या मूळ मालकाला भरपाई देण्याऐवजी, पत्नी आणि जावयाला फायदा करुन दिला
- पत्नी आणि जावयाच्या नावावर जमीन करुन देताना आचारसंहितेचा भंग केला
- खडसेंचा निर्णय राज्य सरकारसाठी अवमानकारक होता
- खडसेंना जमीन व्यवहाराची पूर्ण माहिती होती, पण निर्दोष असल्याची खोटी भूमिका घेतली
- MIDC कायद्यानुसार महसूलमंत्र्यांची या सर्व व्यवहारात कोणतीही भूमिका नसते
- अधिकार नसताना खडसेंनी 12 एप्रिल 2016 रोजी जमीन व्यवहाराबाबत MIDC अधिकाऱ्यांची बैठक घेतली
- महसूल मंत्री म्हणून एकनाथ खडसे हे सर्व शासकीय जमिनीचे संरक्षक होते, पण पत्नी आणि जावयाच्या नावावर त्यांनी जमीन करुन विश्वासाचं उल्लंघन केलं
- जमीन व्यवहारातील खडसेंची भूमिका ही त्यांना मंत्रिपदावर राहण्यास परावृत्त करते
“चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”
समितीची क्लीन चीट
2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी जमिनीच्या चौकशीसाठी झोटिंग समिती नेमली होती. उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. झोटिंग समितीने त्यांचा अहवाल 30 जून 2017 रोजी शासनाकडे अहवाल सादर केला होता. या समितीने खडसे यांना क्लिनचीटही दिली होती.
पंकजा मुंडे नाराज नाहीत, राजीनामे न देण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन – चंद्रशेखर बावनकुळे
काय आहे भोसरी जमीन खरेदी प्रकरण?
एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते त्यावेळचं हे प्रकरण आहे. भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करुन स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं. या सर्व प्रकरणानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.
Read Also :
- “मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत” – पी. चिदंबरम
- नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांचे सत्य बाहेर आलं पाहिजे, अन्यथा हा पोरखेळ बंद करा – मुनगंटीवार
- “हो! पंकजा मुंडेंवर अन्याय होतोय हे खरं आहे”
- गृहमंत्री अमित शहांचा दौरा: दहा ते दुपारी एक दरम्यान दारे खिडक्या बंद करण्याचे पोलिसांचे आदेश
- नाशिकच्या हाय सिक्युरिटी असलेल्या करन्सी नोट प्रेस मधून ५ लाखांच्या नोटा चोरीला