मुंबई : मुंबईसाठी मुख्यमंत्री काम करतात किंवा मुख्यमंत्री फक्त मुंबईसाठी आहेत का? हे प्रश्न बाजूला ठेवून जर पाहिलं, तर देशाच्या आर्थिक राजधानीला जगात आणि देशात अग्रेसर बनवण्यासाठी मुख्यमंत्री तसूभरही तडजोड करत नाहीत, हे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. यातच आता, इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे मुंबईकरांना, समुद्राचं खारट पाणी गोड करून देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नवत प्रकल्पाला आत गती मिळणार आहे.
मोठी बातमी! अखेर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार शुल्क कपातीचा दिलासा!
मुंबई पालिका व आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजीज लि. दरम्यान मालाड, मनोरी येथील २०० द.ल. लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचा, सामंजस्य करार आज करण्यात आला. यावेळी, या प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, “मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प होणे, हे क्रांतीकारी पाऊल असून, आज आपल्या अनेक वर्षाच्या स्वप्नाला मूर्त रुप येत असल्याचे पाहून आनंद वाटत आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
मा. मुख्यमंत्री @OfficeofUT पाण्याचे,पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला निक्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन.
जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे. @AUThackeray @mieknathshinde https://t.co/LPHSSzPIiO— Israel in Mumbai (@israelinMumbai) June 28, 2021
तसेच, “‘जगात काही देशांनी याआधीही समुद्राचे पाणी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नि:क्षारीत करून, मोठ्या प्रमाणात वापरण्याला सुरुवात केली आहे. या तंत्रज्ञानाची मोठी किंमत मोजवाय लागली असली, तरी माणसाचे आयुष्य अधिक मौल्यवान असून, २४ तास त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदरी आहे. यासाठी अशा पर्यायी मार्गांचा विचार आणि अवलंब करणे आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे २०२५ पासून मुंबईकरांना शुद्ध पाणी पुरवठा सुरु होईल,” असे त्यांनी सांगितले.
नाहीतर तिसरी लाट येण्याआधी दुसरी लाट उलटेल, मुख्यमंत्र्यांनी दिला गंभीर इशारा
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाची आणि कृतीची दखल, इस्रायलच्या मुंबईतील दूतावासानंही घेतली असून, त्यांनी खास मराठीत ट्विट करत, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी पाण्याचे, पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्व ओळखून, मुंबईला नि:क्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी, एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल अभिनंदन. जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल, या वाटचालीत महाराष्ट्रासोबत आहे,” असं ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे.
Read Also :
- “अनिल देशमुखांना होणार अटक? ईडीला मिळाले सर्व पुरावे” याचिकाकर्त्या वकिलाने केला दावा
- आंदोलकांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला
- “मंत्री तुडुंब गर्दी जमवतात, मुख्यमंत्री मात्र जनतेला धडे देतात”
- मनसेचा मोठा नेता सायबर क्राईमचा बळी, केले सतर्क राहण्याचे आवाहन
- “होय! मी भक्त आहे! आणि याचा मला अभिमान आहे!”