IMPIMP

महायुतीत बिनसलं..! नरहरी झिरवाळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

Narhari Zirwal vs Dhanraj Mahale

दिंडोरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता महायुतीने जय्यत तयारी सुरू केली आहे. यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिंडोरीत विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांची उमेदवारी जाहिर करत ते भरघोस मतांनी निवडून येतील.  असं विधान अलिकडेच पार पडलेल्या पक्षाच्या मेळाव्यात केलं आहे. त्यावरून आता महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. दिंडोरीचे शिंदे गटातील माजी आमदार धनराज महाले यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

धनराज महाले म्हणाले की, अलिकडेच सुनील तटकरे यांनी मेळाव्यातून उमेदवारीची घोषणा केली आहे. ती एकदम चुकीची आहे. उमेदवारीबाबत महायुतीमध्ये सर्व घटक पक्षाचा एकत्रित विचार अपेक्षित आहे. त्यानंतर उमेदवार ठरवायचे असतात. परंतु त्यांनी उमेदवारी जाहीर करून टाकणे हे अत्यंत चुकीचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षापुर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिंदेंनी मला विधानसभेचा शब्द दिला होता. त्या अनुषंगाने आम्ही सर्वच जण कामाला लागलो आहोत.

हेही वाचा..मुख्यमंत्री शिंदेंचा फडणवीसांना दे धक्का..! शिवसेनेचा ‘हा’ हुकूमी एक्का स्वगृही परतला 

पुढे बोलतांना ते म्हणाले की,  मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मतदारसंघांंमध्ये काम आलीत. त्यामध्ये आम्ही देखील पाठपुरावा केला होता. परंतु विद्यमान असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या नावाने ती काम येतात. हे आपल्याला सर्वत्र माहिती आहे. परंतु त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जी काम आलीत. त्याच्यामध्ये आमचाहीत हातभार लागला आहे.

मधल्या काळामध्ये नरहरी झिरवाळ किंवा त्यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी माझी छाती फाडली तर त्याठिकाणी शरद पवार साहेब दिसतील. असं विधान करून मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काम करत आहेत. यातच लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर गोकूळ झिरवाळ यांनी भास्कर भगरे यांचं काम केल्याचं जाहिरपणे बोलून दाखवलं होतं. यातच झिरवळ साहेब म्हणतात की माझा मुलगा माझ्या शब्दापुढे नाही. मग तुमच्या शब्दापुढे नाही तर मग लोकसभेत भगरेंना मत का टाकलीत असा सवाल देखील त्यांनी केलाय.

हेही वाचा..“देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपविण्यासाठी ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील” 

याप्रकरणानंतर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, सुनील पाटील, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबे या सर्व नेत्यांनी आमची तक्रार सांगितली आहे. आम्ही एक शिष्टमंडळ तयार केले असून यात भाजपचे काही कार्यकर्ते देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी जाणार आहोत. असेही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ज्या पक्षाचा आमदार, तो मतदारसंघ त्याच पक्षाचा असं महायुतीत प्राथमिक सुत्र ठरल्याची चर्चा आहे. यामुळे नरहरी झिरवळ यांचा क्लेम मोठा आहे. त्यानंतरही तुमची भूमिका काय असणार ? त्यावर बोलतांना महाले म्हणाले की, विद्यमान आमदार असतील म्हणून त्यांनाच उमेदवारी द्यायला हवी. असं काही नाही. उमेदवारी कुणाला द्यायची हे जनतेला विचारून ठरवायला हवं. लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक वेगळी असते. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका वेगळ्या असतात. असा टोलाही त्यांनी लगावला.

READ ALSO :

हेही वाचा..विकासाची गॅंरंटी..! जनतेचे १२०० कोटी पाण्यात, नव्या संसदेला लागली गळती..!

हेही वाचा..विधानसभा निवडणुका ठाकरे गट ‘या’ चिन्हावर लढणार ? निवडणूक आयोगाला धाडलं पत्र 

हेही वाचा..बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात पवारांनी २० तरूण हेरले ; परळी, बारामती, कागल ते दिंडोरीत धक्का देणार ? 

हेही वाचा..“तुम्हाला जळी, स्थळी, पाषाणी केवळ उद्धव ठाकरे दिसतात”, इतना डर होना भी चाहिए..! 

हेही वाचा…यंदा माधुरीताईंचं तिकीट कापणार? श्रीनाथ भीमाले भाजपकडून स्ट्रॉंग उमेदवार.!

 

Total
0
Shares
Previous Article
narendra modi sad

विकासाची गॅंरंटी..! जनतेचे १२०० कोटी पाण्यात, नव्या संसदेला लागली गळती..!

Next Article
Devendra Fadnavis

"देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्व गुण, ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत तर आनंदच.."

Related Posts
Total
0
Share