IMPIMP

“आपले अधिकार उध्वस्त झाल्याशिवाय हे गृहस्थ स्वस्थ बसणार नाहीत”, शरद पवारांचा मोदींना टोला

These gentlemen will not rest unless their rights are destroyed Sharad Pawar's advice to Modi

मुंबई :  जे विचाराने त्यांच्याबरोबर नाहीत, त्यांना तुरुंगात टाकतात.  दिल्लीमध्ये उत्तम प्रशासन केजरीवाल यांनी दिलं. तिथल्या शाळा, शैक्षणिक क्षेत्र अतिशय उत्तमरितीने चालवलं गेलं. त्यांनी लोकांनी उत्तम आरोग्य सुविधा दिल्या. आणि दिल्लीचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणं हा आपला धर्म आहे, हे समजून ते काम करतात. पण मोदींना त्यांचं काम मंजूर नव्हतं, म्हणून त्यांना तरुंगात टाकले. याचा स्पष्ट अर्थ आहे, की मी म्हणेल त्या पद्धतीने लोकशाही हा एककलमी कार्यक्रम देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतला आहे. जर असेच चालू राहिले तर माझी खात्री आहे, आपले अधिकार उध्वस्त झाल्याशिवाय हे गृहस्थ स्वस्थ बसणार नाहीत. असा इशारा शरद पवारांनी मोदींना दिला.

हेही वाचा…“मी पण ठाकूर, माफी कधीच मागणार नाही, ” हितेंद्र ठाकूरांनी रवींद्र चव्हाणांना दिला कडक इशारा 

लोकसभेची देशाची निवडणूक तुमच्या माझ्या या देशातील सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या भवितव्याची आहे. अनेक निवडणुका आपण पाहिल्या, पण या देशाचे नेतृत्व ज्यांच्याकडे होते, त्या सगळ्या नेत्यांनी संसदीय लोकशाही पद्धती मजबूत कशा करता येतील, या संदर्भातील अखंड प्रयत्न केले. ही पहिली निवडणूक अशी आहे, स्वातंत्र्यानंतर या निवडणूकीत देशासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि तुम्हा लोकांचा मुलभूत अधिकार कसा वाचवायचा, यासंबंधीचा प्रश्न आपल्यासमोर झाला. त्याचे महत्त्वाचे कारण ज्यांच्या हाती सत्ता आहे, ते सत्ताधारी आज या सत्तेचा वापर प्रधानमंत्र्यांच्या मनाविरुद्ध एखादी भूमिका कोणी मांडत असेल, तर त्यांना उध्वस्त कसे करता येईल यासंबंधीची कामगिरी आजच्या प्रधानमंत्र्यांकडून होते. असेही शरद पवार म्हणाले.

हेही वाचा..“हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, शरद पवारांनी मोदींना डिवचलं 

दरम्यान,  शिवसेनेनेबद्दल नकली सेना म्हणाले. ज्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तुमच्या संकटाच्या काळात तुम्हाला वाचवण्याचे काम केले, हे महाराष्ट्राला माहिती आहे, पण तुम्ही विसरलात. तुम्ही काहीही म्हणालात, कितीही टिकाटिप्पणी केली तरी राज्यातील कानाकोपऱ्यातला तरुण आणि मराठी माणूस बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार जो आज उद्धवजी पुढे घेऊन जात आहेत, त्याच्यामागे शक्ती उभी केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही कितीही टिकाटिप्पणी केली, तरी त्याच्याकडे या राज्याचा सामान्य माणूस ढुंकूनही बघणार नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.

READ ALSO :

हेही वाचा..“भाजपला आता संघाची गरज उरली नाही”, जे.पी. नड्डांचं वक्तव्य चर्चेत 

हेही वाचा..संजय काकडेंनी घेतला अटक वॉरंटचा धसका, तक्रारदाराला बोलवून सुपूर्द केला धनादेश 

हेही वाचा..“राज ठाकरे मोदींच्या चरणी लीन झालेत,” कुणी लगावला टोला ? 

हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत बाप एका पक्षात तर पोरगा दुसऱ्या पक्षात” 

हेही वाचा…“महायुतीचं बटन इतक्या जोरात दाबा की, पाकिस्तानात ‘मातम’ सुरु झाला पाहिजे” 

Total
0
Shares
Previous Article
BJP no longer needs a team. Nadda's statement in discussion

"भाजपला आता संघाची गरज उरली नाही", जे.पी. नड्डांचं वक्तव्य चर्चेत

Next Article
Sensational allegation of distribution of crores of rupees by BJP to people in Mumbai

"भाजपकडून मुंबईत कोट्यवधी रूपये लोकांना वाटले", दानवेंचा खळबळजनक आरोप

Related Posts
Total
0
Share