नाशिक : रविवारी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पुर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी काॅंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. त्यातच त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजीही केली.
हेही वाचा….“संजय गायकवाडांनी संपकरी कर्मचाऱ्यांची लायकी काढली”,राष्ट्रवादीने साधला निशाणा
एकनाथ शिंदे साहेब आपण मुख्यमंत्री आहात. संधी मिळालेली आहे. काय करताय. आमची संधी घालवली हे खरंय.. पण गडी मेहनती आहे हे विसरून जाता येत नाही. जो काही वेळ मिळाला आहे, जी संधी मिळाली आहे. ती त्या संधीत जास्तीत जास्त लोकांपर्यत काम करण्याचा प्रयत्न आपण करत आहात ते आम्ही मनापासून पाहतोय ते नाकारता येत नाही. असं बाळासाहेब थोरात कौतुक केलं.
हेही वाचा…“मुंब्रामध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांना द्यायची घर एका गैंग नी पाहिजे तशी वाटून टाकली”, आव्हाडांचं ते ट्विट चर्चेत
पुढे बोलतांना ते म्हणाले की, हे सगळं जे लोकशाहीत आहे ते आपण सर्वसामान्यांच्या आयुष्याबत आनंद निर्माण करण्याकरता आपण करत असतो. तो आनंद निर्माण करण्याची जबाबदारी लोकशाहीने सर्व पक्षांनी दिली तशी आपल्यावरही दिलेली आहे. शेवटी ते कार्य आपण एकत्रित करणं हे खरं महत्वाचं आहे. त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श आपल्यासमोर असला पाहिजे. पंकजा ताई त्यांचा समर्थ वारसा पुढे नेत आहेत. याचं आम्हाला कौतुक आहे. असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
हेही वाचा….उद्धव ठाकरेंच्या विराट सभेला शिंदे गटाकडून प्रत्यु्त्तर, गोळीबार मैदानावर आज शिंदेंची सभा
दरम्यान, या कार्यक्रमाला नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पुर्णाकृती पुतळ्याचा लोकापर्ण सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री भारती पवार, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, दादा भुसे यांच्यासह राज्यातील विविध नेते यावेळी उपस्थित आहे.
Read also
- हेही वाचा…गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले, तीन वेळा शपथविधी झाले, त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार ? बच्चू कडू
- हेही वाचा…“शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय, हे उभा देश ओळखतो ? ज्याला कावीळ झालेली असते..” रामदास कदमांची टिका
- हेही वाचा….शिंदेंच्या सभेआधी जोरचा झटका, योगेश कदम यांचे कट्टर समर्थक ठाकरे गटात
- हेही वाचा…“इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्हा जगाल”, संभाजी राजेंचा सरकारवर हल्लाबोल
- हेही वाचा…“गद्दार माणूस काय करारा जवाब देऊ शकतो ?” एकनाथ शिंदेंच्या सभेवर दानवेंची तिखट प्रतिक्रिया